vasai cos power company boilor blast three death seven injured ssa 97 | Loksatta

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी

Vasai Cos Power : वसईमध्ये असलेल्या कॉस पॉवर या कंपनीत भीषण आग लागली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी
प्रतिकात्मक छायाचित्र

वसई परिसरात असलेल्या कॉस पॉवर कंपनीला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कॉस पॉवर या कंपनीत विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार केली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २.३० च्या सुमारास या कंपनीतील बॉयरलमध्ये स्फोट झाला. त्यामुळे कंपनीत ही आग लागली. या आगीत तीन ३ कामगारांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – राज्याचा सत्तासंघर्ष एक महिना लांबणीवर, पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला

आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आता या आगीवर नियंत्रण आणण्याची माहिती मिळत आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विरार : ७० हजार नॅपकिन वितरणाविना पडून , अस्मिता योजनेचे ढिसाळ नियोजन

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी
‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक