मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार येथील खानिवडे टोल नाक्याची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर विरार जवळ खानिवडे टोलनाका आहे. सध्या या टोल नाक्याचे व्यवस्थापन हे श्री साई एंटरप्राइजेस यांच्या कडे टोल वसुलीचे व्यवस्थापन आहे. रविवारी याच महामार्गावरून चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी या टोलनाक्याची तोडफोड करून पसार झाले. यात तोडफोडी दरम्यान टोलनाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी सात ते आठ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात टोलनाका व्यवस्थापकाच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे. गाडीला नंबर फलक नसल्याने गाडीची अद्यापही माहिती मिळाली नसून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे असे वाघ यांनी सांगितले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांचा संताप
मुंबई अहमदाबाद महामार्गावर शिरसाड फाटा ते घोडबंदर या दरम्यान मोठं मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु दुसरीकडे सरार्स पणे टोलवसुली सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या संतापामुळे हा टोलनाक्याची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.