वसई : दिवाळीच्या निमित्ताने वसई विरार मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाट व दिवाळीसंध्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम वसई विरारमध्ये सादर करण्यात आले. त्यामुळे  सुमधुर सुरांनी व लखलखित तजोमय  दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण वसई विरार उजळून निघाले आहे. दिवाळी निमित्त वसई विरार शहरासह विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

वसईत मराठी नाट्य रसिक परिवार यंग स्टार्स ट्रस्ट विरार यांच्या तर्फे माणिकपूर येथे मराठी पाऊल पडते पुढे या सुमधुर गाण्यांची दिवाळी पहाट या कार्यक्रम पार पडला. वसईत समाज मंदिर ट्रस्ट तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता.  नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील शिवाजी चौक मंडळ यांनी एक संगीतमय उष:काळ हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साह पार पडला. तर विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथेही आगरी युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिवाळी संध्या संगीतमय कार्यक्रमाची मैफिल रंगली होती.

वसई विरारच्या अन्य ठिकाणच्या भागात दिवाळी पहाट व दिवाळी संध्या या कार्यक्रमांची रेलचेल होती. अशा विविध संगीतमय गीतांनी सोमवारी आणि मंगळवारी  दिवाळी पहाट व दिवाळी संध्या उजळली होती. यासह इतर भागातह संगीत गायन मैफिल, ढोलताशा, भजन, नृत्य यामुळे अवघी नगरीच दुमदुमून गेली होती. यावेळी गायक कलाकार, ढोलकीवादक, नृत्य कलाकार अशा विविध प्रकारच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.  तयांनी सादर केलेली भावगीते, लोकगीते, लावणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले रसिक प्रेक्षकांनी ही त्यांनी सादर केलेल्या कलेला दाद देत सुमधुर गीतांचा लहान मुलांपासून ते आबालवृद्धा पर्यंत अनेक रसिक प्रेक्षकांनी आनंद लुटला. दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन तर काही ठिकाणी मिठाईने तोंड गोड करून हा दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. तर अनेकांनी पारंपारिक वेशभूषा करून आनंद साजारा केला.  सर्वत्र रंगेबेरंगी फुलांची तोरण, पताका, रांगोळ्या, कंदील व भक्तिमय झालेला परिसर असे संपूर्ण असे चित्र वसई विरार शहरात पाहायला मिळाले.