वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. पालिकेला आता पंतप्रधान अनुदान योजनेतून १०० ई बस उपलब्ध होणार असल्याने त्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे. यासाठी नवघर आणि नालासोपारा या दोन ठिकाणी आगार निर्मिती व चार्जिंग स्वीचिंग स्टेशन तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत २७.१७ कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात. मात्र शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत आहे. तर काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत असते.

प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पालिकेने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ४० ई बस आहेत तर केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखीन १०० ई बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र या बस उभ्या करण्यासाठी जागेची अडचण व  चार्जिंग केंद्राचा अभाव आहे.

यासाठी आता त्याची पूर्व तयारी करण्यास पालिकेच्या परिवहन विभागाने सुरुवात केली आहे. यात वसईच्या नवघर व नालासोपारा या ठिकाणी नवीन आगारांची निर्मिती केली जाणार आहे. यात १. १२ एकर इतक्या क्षेत्रात नालासोपारा आगार तयार केले जाणार असून यात ४० बसेस उभ्या केल्या जाऊ शकतात. यासाठी १६.३७ कोटी निधीचे नियोजन आहे.

तर नवघर येथील आगार हे १.२५ एकर जागेत तयार केले जाणार असून या ठिकाणी ६० बस उभ्या राहतील इतकी क्षमता आहे. यासाठी १०.८० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या दोन्ही आगारात कमी दाब विद्युत वाहिनी व उच्च दाब वाहिन्या व संरचनात्मक बांधकाम याचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाने दिली आहे.

चार्जिंग साठी २० स्वीचिंग केंद्र

पालिकेच्या परिवहन विभागात ई बस जरी दाखल होत असल्या तरी त्या चार्जिंग केंद्राचा मोठा अभाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत पालिकेचे मुख्यालयाच्या मागील बाजूस एकमेव चार्जिंग केंद्र आहे. ते सुद्धा अपुरे आहे. त्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या नालासोपारा आगारात ८ चार्जिंग स्विच तर नवघर आगारात १२ चार्जिंग स्वीच असे २० स्वीचिंग तयार केले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तप्रधान अनुदान योजनेतून पालिकेला ई बस उपलब्ध होणार आहेत. त्याच अनुषंगाने नवीन आगार तयार करण्याची पूर्व तयारी सुरू आहे. – विश्वनाथ तळेकर, सहायक आयुक्त परिवहन विभाग