वसई : वसई विरार महापालिकेने आरक्षित जागा ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ५६ आरक्षित भूखंड ताब्यात घेतले आहेत. त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करून या जागा संरक्षित केल्या आहेत. याशिवाय २० गावांमधील ८० ग्रामपंचायत निहित जागा ताब्यात घेऊन पालिकेच्या नावावर करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार उपप्रदेशसाठी २००७ मध्ये मंजूर असलेल्या  विकास आराखडय़ात सुमारे ८८३ भूखंड विविध विकास कामांसाठी आरक्षित होते.  यातील १६२ आरक्षणे ही शासकीय जागांवर तर उर्वरित आरक्षणे ही खासगी जागेवर आहेत. विकास आरखडा लागू होऊन देखील या  विकास आराखडय़ाची अंमलबजावणी झाली नव्हती. यातील पालिकेच्या ८८६ राखीव भूखंडांपैकी ३२९ भूखंडांवर अतिक्रमण झाले होते. यातील ५६ भूखंडांवरील अतिक्रमण करून ती पालिकेने ताब्यात घेतली आहेत. या भूखंडांवरील अतिक्रमण करून या जागा संरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांवरील अतिक्रमणे काढून त्या देखील ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation success to take possession of government land with reserved plots zws
First published on: 11-05-2023 at 13:09 IST