वसई: मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात विविध प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. विरारच्या सहकार नगर भागात एका दुकानाची भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

रविवार सायंकाळपासून वसई विरार भागात पावसाचे चांगलाच जोर पडकला आहे. सतत पावसाची संतधार सुरूच असल्याने सखल भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे, जीर्ण झालेल्या इमारतीचे भाग कोसळणे अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.

सोमवारी रात्री विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात एका दुकानाची भिंत अचानक कोसळली. पाऊस सुरू असल्याने जवळपास कोणीही नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत अतिशय धोकादायक अवस्थेत होती. पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी पोहोचून पडलेला मलबा हटवून परिसर मोकळा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे शहरातील धोकादायक, आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत, त्यांची तत्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात जीवित व वित्तहानी होणार नाही अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.