वसई : विरारच्या चिखलडोंगरी गावातून जात पंचायत बरखास्त झाल्याने गावातून बहिष्कृत केलेले १३ ग्रामस्थ अखेर गावात परतले आहे. गावात आता कसलाही त्रास नाही. अतिशय मोकळं वातावरण असून कसलीच भीती नाही अशी प्रतिक्रिया या ग्रासम्थांनी दिली.विरारच्या चिखलडोंगरी गावात हिंदू मागेला समाज राहतो. पूर्वापार परंपरेनुसार गावात जात पंचायत कार्यरत होती. २०१७ मध्ये जात पंचायचीविरोधात सामाजिक बहिष्काराचा कायदा करून तो बेकायेदशीर ठरिवण्यात आल्यानंतरही जात पंचायत अस्तित्वात होती. क्षुल्लक कारणांवरून ग्रामस्थांना २५ हजार ते ५० हजारांपर्यंतचा दंड आकारला जात होता. जात पंतायचीचे स्वयंघोषित पंच गावातील लोकांवर दहशत गाजवत होते. दंड न भरल्यास बहिष्कृत करून वाळीत टाकले जात होते. ८ नोव्हेंबर पासून लोकसत्ताने या प्रकरणाचा पाठपुरावा करून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर गावात सभा घेऊन जात पंचायत रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय ज्यांच्यातडून दंड आकारला गेला त्यांना तो परत करण्यात आला होता.

जात पंचायत रद्द झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रकरणी तक्रार करणारे उमेश वैती आणि दर्शन वैती यांना बहिष्कृत केल्यामुळे ते जीवाच्या भीती पोटी गाव सोडून गेले होते. आता दोन्ही कुटुंबातील १३ जण गावात परतले आहेत. गावात कसलीही भीती नाही आणि अतिशय मोकळे वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. मी या प्रकरणामुळे १५ दिवस कुटुंबासहीत गाव सोडून भूमीगत झालो होतो. पण आता चित्र एकदम बदललं आहे. मला कुणीही त्रास दिला नाही तसेच जात पंचायचीबद्दल आता शब्दही उच्चारला जात नाही. मी मोकळेपणाने रिक्षा चालवू लागलो आहे, असे या प्रकरणातील एक पीडित उमेश वैती यांनी सांगितले. माझी बहिण अनेक वर्षे गावाबाहेर होती. आता ती देखील गावात येऊ लागली आहे असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>आईच्या वाढदिवसाला निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू, भाईंदरमधील हृदयद्रावक घटना

लोकसत्ताचे मानले आभार

गेली अनेक वर्ष आम्ही जात पंचायतीच्या विळख्यात होतो. सतत दहशतीचे वातावरण होते. परंतु लोकसत्ताने या प्रश्नाला वाचा फोडली आणि आम्हाला न्याय मिळाला असे ग्रामस्थांनी सांगितले. जात पंचायतीच्या अनिष्ट विळख्यातून सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी लोकसत्ताचे आभार मानले आहेत. आम्हाला झालेला आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही असे ग्रामस्थ म्हणाले. अन्य गावात रहात असलेल्या मांगेला समाजाने देखील ही प्रथा नष्ट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.