वसई- भाईंदरमध्ये एका जोडप्याच्या प्रेमसंबंधाला धार्मिक वळण मिळाल्याने तणाव निर्माण झाला होता. या तरुणाने अल्पवयीन तरुणीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून जमावाने  त्याला मारहाण करत त्याच्या दुकानाची तोडफोड केली. या प्रकरणाला धार्मिक वळण लागल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर भाईंदर पोलिसांनी मध्यरात्री २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचा >>> नालासोपाऱ्यात महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

भाईंदरच्या केबिन रोड परिसरात २४ वर्षीय तरुणाचं एक दुकान आहे. त्याचे १७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. तो रात्री तिला भेटायला दुकानात बोलवत असे. दुकानाचे पुढील दार बंद करून तो तिला मागच्या दाराने बोलवत होता. याची कुणकुण मंगळवारी नागरिकांना लागली. नागरिकांनी या तरूणाला त्याला धरून चोप दिला. तरुण आणि तरुणी भिन्न धर्मीय असल्याने ही गोष्ट वार्‍यासारखी पसरली आणि धार्मिक संघटनेसह मोठा जमाव जमला. संतप्त झालेल्या जमावाने बाहेरूनच दुकानाची तोडफोड केली. माजी आमदार नरेंद्र मेहता, आमदार गीता जैन हे देखील मध्यरात्री घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा >>> वसई : अनधिकृत बांधकाम कोसळून महिलेचा मृत्यू, ठेकेदारांनी केला पुरावा नष्ट, ३ दिवसांनी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवघर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र पीडित तरुणी तक्रार देण्यास तयार नव्हती. अखेरीस तिचे मन वळिवण्यात आले आणि तिच्या तक्रारीवरून नवघऱ पोलिसांन रात्री उशिरा आरोपी तरूणाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचार विरोधी कायदा  पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही आरोपीला अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.