संदीप धुरत

विक्रोळी हे मुंबई शहराच्या मध्यभागी असलेले उपनगर आहे. हा परिसर मुख्यत: मुंबईच्या पूर्वेकडील भागातील निवासी परिसर आहे. या परिसरात गोदरेज गटाचे बरेच व्यावसायिक आणि गृहनिर्माण प्रकल्प आहेत. विक्रोळी परिसर हा मुंबईतील इतर भागांशी उत्कृष्टरीत्या जोडला गेला असल्यामुळे प्रवासासाठी हा परिसर मध्यवर्ती ठरतो. विक्रोळी हा मुंबईतील एक अतिशय महत्त्वाचा निवासी परिसर आहे. या भागात बरीच मोठी रहिवासी संकुले आहेत आणि त्याच्या आसपास बरेच महत्त्वाचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्माण झाले आहेत आणि काही निर्माणाधीन आहेत. विक्रोळीजवळील पवई, हिरानंदानी हे एक महत्त्वाचे निवासी आणि वाणिज्य क्षेत्र असून, विक्रोळीला जवळ असल्यामुळे त्याचा फायदा येथील स्थावर मालमत्ता क्षेत्राला झाला आहे. स्वातंत्र्यापूर्वी गोदरेज गटाने यामध्ये प्रथम आपले प्रकल्प बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते, हे क्षेत्र त्यांच्या निवासी प्रकल्पांसाठी आणि उद्योग आस्थापनांसाठी योग्य आहे. या भागात निवासी प्रकल्प जसे- पार्कसाइट, कन्नमवार नगर, टागोर नगर इ. सारख्या अजूनही बऱ्याच निवासी  वसाहती आहेत. घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी येथे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत- जे गृह खरेदी करू शकणाऱ्यांच्या आर्थिक गणितात बसू शकतात.

विक्रोळी परिसरातील कनेक्टिव्हिटी-

’ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ १९.१ किमी अंतरावर आहे.

’ मुंबईचे एक महत्त्वाचे मध्य रेल्वेवरील स्टेशन आहे.

’ विक्रोळीला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे पूर्व महामार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग. या परिसरात अनेक बस थांबे आहेत आणि त्यायोगे प्रवास सोपा आणि सुलभ होतो.

विक्रोळीमध्ये अन्य सामाजिक सुविधा आणि शाळा, सामाजिक पायाभूत सुविधा चांगली विकसित झाली आहे. इथे अनेक शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. या परिसरात मनोरंजन पार्क, अनेक बँका आणि एटीएम, पेट्रोल पंप आणि इतर सुविधा आहेत. अनेक नागरी आणि व्यावसायिक संस्था जवळपास  आहेत.

विक्रोळीजवळील रोजगार हब-

’ बीकेसी ते विक्रोळी- चेंबूरमार्गे १४ किमी अंतर आहे.

नवी मुंबई ते विक्रोळी हे अंतर २२ किमी आहे.

’ पवई ते विक्रोळी हे अंतर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व जेव्हीएलआरमार्गे ७ किमी आहे.

’ लोअर परळ ते विक्रोळी हे अंतर १८ किमी आहे.

यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास विक्रोळीजवळील प्रवास साधनांमुळे सोपा होतो. सध्या येथे बरेच निवासी प्रकल्प सुरू असून अ‍ॅमेझॉन इंडियानेसुद्धा येथे व्यावसायिक जागा संपादित केली आहे. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधा आणि व्यासायिक प्रकल्प यांचा परिणाम भविष्यात येथील स्थावर मालमत्ता गुंतवणूक वधारण्यात होणार हे नक्की!

sdhurat@gmail.com

(लेखक हे स्थावर मालमत्ता व्यवस्थापन विशारद आहेत)