scorecardresearch

ठाण्यात घर खरेदी ठरणार फायदेशीर

नवनव्या प्रकल्पांमुळे आणि विविध आधुनिक गोष्टींमुळे शहराची एक वेगळी नवी ओळखही निर्माण होऊ लागली आहे.

advantages of buying property in thane
ठाण्यात घर खरेदी

ठाणं  हे घर घेण्यासाठी ग्राहकांची पहिली पसंती असलेलं शहर. मुंबईत घर घेणं शक्य नसलेले ग्राहक मुंबईच्या लगतच असलेल्या ठाणे शहराला पहिली पसंती देतात. ठाण्यात सुरू असलेले मेट्रो प्रकल्प, ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर यांमुळे दळणवळणासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरणारेअसे मध्यवर्ती शहर म्हणून ठाण्याकडे बघितले जाते. तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आता उत्तमोत्तम गृहप्रकल्पांसाठी योग्य म्हणून ओळखलं जात आहे. त्यामुळे ग्राहकाला कायम वास्तव्यासाठी आणि गुंतवणुकीसाठीही ठाण्यात उत्तम गृहप्रकल्प उपलब्ध होत आहेत. ठाणे हे सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत शहर मानले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठाण्यात असते. इथलं राहणीमान उत्तम असून हे वास्तव्यासाठी सुरक्षित शहर आहे. त्यामुळे अनेक घर खरेदीदार ठाण्यात घर घेण्यास पसंती दर्शवितात. याच पार्श्वभूमीवर क्रेडाई- एमसीएचआयच्या ठाणे शाखेच्या वतीने रेमण्ड ग्राऊंड येथे कालपासून मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ६ फेब्रुवारी पर्यंत खुले आहे. या प्रदर्शनात गृह वित्त पुरवठय़ा संदर्भातल्या गोष्टीही जाणून घेता येतील. घरासाठी उत्तम पर्याय शोधत असलेल्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खूप फायदेशीर ठरेल असे आयोजकांचे म्हणणे आहे. घर खेरदी करणाऱ्या ग्राहकांचा ड्रीम होमचा शोध या प्रदर्शनात पूर्ण होईल अशी आयोजकांना आशा आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच छताखाली उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध होतील. जणेकरून त्यांचा ‘सर्च टाईम’ वाचेल. ठाण्याचा विकास करताना तिथे गृहप्रकल्प, अस्थापना कार्यालये, आणि व्यापारी संकुले यांचा उत्तम मिलाफ असेल. सपर्कसाधनांचीही उपलब्धता असेल.

नवनव्या प्रकल्पांमुळे आणि विविध आधुनिक गोष्टींमुळे शहराची एक वेगळी नवी ओळखही निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात स्वस्त घरे उपलब्ध होत असल्यामुळे अनेक नागरिक ठाण्याला पसंती देऊन ठाण्यात स्थिरावत आहेत. शहरातील नौपाडा, घोडबंदर, पोखरण, माजीवडा, खोपट, पाचपाखाडी आणि कळवा या भागात गृहप्रकल्प उभे राहातआहेत. त्यास नागरिक पसंती देत असल्याचे एका अहवालातून वर्षभरापूर्वीच समोर आले आहे.

संपर्कसाधनांच्या बाबतीत ठाणेकर खूप नशिबवान आहेत असेच म्हणायला हवे. बोरीवली, पनवेल, कल्याणच्या दिशेने जाण्यासाठी अनेक पर्यात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ठाणे-बोरीवली बोगद्यामुळे नॅरशनल पार्क कमी अंतरात गाठता येणार आहे. ठाण्यापासून पनवेलचे एअरपोर्टही जवळ आहे. फ्री-वेचा ठाण्यापर्यंतचा विस्तार, जलवाहतूक आणि मेट्रो लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. परिणामी येत्या काळात ठाण्यातील घरांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून आताच ठाण्यात घर खरेदी करणं फायदेशीर ठरणार आहे.

 मुलांच्या सर्वागिण विकासासाठी फायदेशीर

आठवडाभर काम करून शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी आपली सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी ठाणे हे उत्तम शहर आहे. ठाण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. तसेच मुलांसाठी अनेक खेळांचे प्रशिक्षण उपलब्ध आहे, तसेच सांस्कृतिक गोष्टी शिकता येतात. अगदी नृत्य, गाणे, नाटक यांची प्रशिक्षण शिबिरे व क्लासेस उपलब्ध आहेत. जेणेकरून आपल्या मुलांच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक वाढ उत्तमपणे होईल. मुलांसाठी शैक्षणिक आणि अन्य गोष्टींचे प्रशिक्षण यांसाठी ठाणे हे उत्तम शहर आहे. ठाण्याच्या विकासामध्ये ठाणे पालिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. नागरिकांसाठी उत्तम सेवा पुरविण्यात पालिकेचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने इथल्या नागरिकांसाठी उत्तम सेवा पुरविल्या जातात.

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:30 IST