शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वत:चे घर असावे. घर घेतल्यावर कुटुंबातील सर्वाच्या गरजा व सोयीनुसार अंतर्गत रचनेमध्ये बदल करून गृहसजावट केली जाते. उदा. वन बी. एच. के.मध्ये बाल्कनीत मुलांसाठी स्टडी रूम, किचनचा उपयोग बेडरूम म्हणून व किचन पॅसेज अथवा बाल्कनीमध्ये हलवतात. सर्वानाच आर्किटेक्टला बोलावून प्लान काढून घराचे काम करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक कारागीर अथवा कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कामे केली जातात. अशी कामे करताना खालील गोष्टींवर विशेष लक्ष देऊन काम करून घेणे आवश्यक आहे.
* आपल्या गरजा संबंधित आíकटेक्ट, इंटेरियर डिझायनर अथवा कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आणून द्याव्यात.
* शेजारी-पाजारी, मित्र किंवा दुसऱ्याने केले म्हणून आपल्या घरात बदल करण्यापेक्षा आपली खरी गरज, सोय व आíथक बजेट याकडे लक्ष द्यावे.
* इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या आर.सी.सी. बांधकामाबाहेरील मुख्य िभती तोडणे व धक्का लावणे यांसारखे प्रकार करू नयेत. कारण त्यामुळे इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो व गळतीची समस्या निर्माण होऊ शकते, जे कायमस्वरूपी राहतात.
* इमारतीमधील पोकळीमध्ये लोखंडी अँगल टाकून जागा वाढवणे हे नियमबाह्य व धोकादायक आहे.
* काम चालू करण्याआधी फ्लोअर प्लान काढून करावयाच्या कामाची लिस्ट करावी.
* काम सुरू करताना प्रथम प्राथमिक काम करून घ्यावे. उदा. खराब प्लास्टर काढणे, जुन्या टाइल्स, किचन ओटा, नको असलेले फíनचर या सर्व गोष्टी काढून टाकाव्यात.
* इमारत जुनी असल्यास बाहेर आलेले स्टिल, स्लॅबचे मोकळे झालेले भाग या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी स्ट्रक्चरल रिपेअरकडून दुरुस्त करून घ्याव्यात. उर्वरित भागावर प्लास्टर करून घ्यावे.
* बाथरूम, टॉयलेट, वॉिशग मशीन यासाठी प्लंिबगची कामे करून घेणे (कन्सिल्ड हवे असल्यास टाइल्स लावल्यावर ही कामे करता येत नाहीत.) सर्व रूममधील कन्सिल्ड वायिरगची कामे करून घ्यावीत.
* बाथरूम- टॉयलेटच्या टाइल्स लावण्याआधी वॉटर प्रूफिंगचे काम करून घेणे व त्यामध्ये पाणी भरून लिकेज टेस्ट घ्यावी. जेणेकरून खाली राहणाऱ्या फ्लॅटधारकास त्रास होणार नाही.
* प्लंिबगसाठी पूर्वी जी. आय.चे पाइप वापरत सध्या सी. पी. व्ही.सी., यु.पी. व्ही.सीचा वापर केला जातो.
* बहुतेक घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसवलेल्या असतात. त्या जमिनीपासून (फ्लोअर लेव्हलपासून) फक्त ७ ते ८ फूट उंचीवर असतात. त्यामुळे नळाला पाण्याचे प्रेशर कमी असते. अशा ठिकाणी शॉवर टॉयलेटसाठी फ्लॅश वॉल लावू नयेत. सेल्फ मोटर असणारे पॅनल शॉवर चालतील. कन्सिल्ड प्लंबिंग केल्यावर किमान २४ तास पाण्याचे प्रेशर देऊन लिकेज टेस्ट घेणे.
* वायिरग करताना आय. एस. आय. मार्क व चांगल्या प्रतीची वायर वापरावी. घरातील मेन स्विचसाठी ई.एल.सी.बी. वापरावा. ए.सी. व गिझरसाठी ४ स्वे. मि.मि. लाइट, पंखा व इतर वायिरगसाठी १.५ स्वे. मि.मि. सब मेनसाठी २.५ स्वे. मि.मि. गेजच्या वायर वापराव्यात. टीव्ही-कॉम्प्युटर पॉइंटसाठी योग्य ठिकाणी वायर टाकून घ्याव्यात. प्रत्येक रूमप्रमाणे त्यांच्या लोडनुसार एम.सी.बी. टाकून घेणे. जेथे लोड शेिडगचा त्रास आहे तेथे इन्व्हर्टर लावल्यास प्रत्येक रूममधील किमान १ पंखा, टय़ूब लाइट, दिवा त्याच्याशी जोडावेत.
* घरातील भिंतींना एक सलगता व समानता आणण्यासाठी िभतींवर पी.ओ.पी लावले जाते. शक्य नसल्यास फक्त हॉलमधील भिंतींना पी.ओ.पी. करून घ्यावे. सििलगला शेवटचा मजला असेल तर गरम होऊ नये म्हणून किंवा वेगवेगळे डिझाइन किंवा लाइट इफेक्टसाठी फॉल सििलग बनविले जाते. त्यासाठी पी.ओ.पी. शीट, लाकडी मेंबर, अॅक्रॅलिक शीट यांचा वापर गरजेनुसार करतात. आíथक बजेट कमी असेल तर फक्त मोिल्डग पट्टी, क्राऊिनग करावे.
* घरातील फ्लोिरगसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. उदा. नॅचरल मार्बल, कोटा, पॉलिश फरशी, ग्रेनाईट, व्हेट्री फाईड, सिरॅमिक टाइल्स, वुडन कम्पोसिट यांचा वापर केला जातो. कोणताही मार्बल किंवा नॅरचल स्टोन लावल्यानंतर त्यावर पॉलिश करावे लागते. परंतु टाइल्स लावल्यावर पॉलिशची गरज नसते (अपवाद मोझ्ॉक टाइल्स). अनेकदा बेडरूममध्ये वुडन फ्लोिरग केले जाते. परंतु दमट हवामानामध्ये त्यांना बुरशी पकडते. फक्त कोरडय़ा व थंड हवेच्या ठिकाणी असे फ्लोिरग उपयुक्त ठरते. अशावेळी वुडनसारख्याच दिसणाऱ्या टाइल्सदेखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा. फ्लोिरग करताना जागा समान करून घ्यावी. वर खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
* किचन प्लॅटफॉर्म तयार करताना घरातील गृहिणीच्या गरजा लक्षात घ्याव्यात. त्यानुसार मुख्य शेगडी, सिंक व सíव्हस काऊंटर तयार करणे. शक्यतो ग्रेनाईटचा वापर करावा. किचन प्लॅटफॉर्मच्या खाली सामान व स्वयंपाकातील भांडी ठेवण्यासाठी ट्रॉली करून घ्यावी. शेगडीजवळ खिडकी नसेल तर चिमणीचा वापर करावा. परंतु एक्झॉस्ट फॅन नक्कीच लावावा. कारण प्रेशर कुकरची हवा, फोडणी, तळणे यांची वाफ/धूर चटकण बाहेर जातो. मोकळ्या िभतींवर शेल्फ करून घ्यावेत. ते अखंड प्लायवूड अथवा मार्बलचे करून त्यावर फ्रेम करून शटर लावावे.
* खिडक्या तयार करताना त्यांना आतमधून मार्बल अथवा ग्रेनाईटचे फ्रेमवर्क करावे. अल्युमिनियम सेक्शन यु.पी.व्ही.सी. अथवा लाकूड व काच वापरून खिडक्या तयार करता येतात. मच्छर जाळी काळजीपूर्वक लावावी. हॉलमध्ये बाल्कनी समाविष्ट केली असेल तर फ्रेंच िवडो करावी व जमिनीपासून १७ इंचांवर ग्रेनाईट अथवा मार्बल लावून बसण्याची सोय करून घ्यावी.
* फíनचर शक्यतो प्लायवुड लाकूड यांपासून तयार केले जाते. कीड, ओल यांचा प्रादुर्भाव मोठा असलेल्या ठिकाणी वॉटर प्रूफ प्लायवुड वापरावेत. किंवा कपाट वॉर्डरोब हे मार्बलमध्ये तयार करून त्यावर लाकडी फ्रेमवरती शटर बसवावेत. बेड तयार करताना घरातील व्यक्तींच्या उंचीनुसार त्याची लांबी ठेवावी. फíनचरचे कोने कोपरे गुळगुळीत ठेवावेत. जेणेकरून लागणार नाहीत. काही ठिकाणी शेअिरग वॉल काढून एक अथवा दोन्ही बाजूंनी कपाट तयार करू शकता. फिनििशगसाठी त्यावर लॅमिनेशन उदा. सनमायिका लावता येतो. अथवा विनियर लावून पॉलिश करावे. त्यामुळे एकसंध लाकडाचा इफेक्ट येतो. सध्या कोरियनसारखे महागडे लॅमिनेशनही केले जाते. घरातील फíनचर हे सुटसुटीत असावे. घरामध्ये फíनचर असावे. फíनचरमध्ये घर नसावे.
* घराला रंग लावणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. प्रथम सर्व भितींवरचा जुना रंग, पोपडे काढून घ्यावे. प्लास्टर पोकळ असल्यास तोडून नवीन करावे. िभतींमधील लिकेज, ओल असल्यास ती दुरूस्त करून घ्यावी. अन्यथा नवीन रंग लवकरच खराब होऊ शकतो. िभतीस सॅन्ड पेपर अथवा वायरब्रश वापरून साफ करावे. त्यानंतर त्यावर एक कोट प्रायमर लावावे. प्रायमरनंतर त्यावर तयार केलेली अथवा रेडिमेड वॉलपुट्टी लावावी. सर्व िभती व सििलग एक सलग करून घ्याव्यात. त्यावर पुन्हा एक कोट प्रायमर लावावा. प्रायमर लावून निवडलेल्या रंगातून एक कोट पेंटचा द्यावा. नंतर सर्व लाइट फिटिंग फ्रेम फिटिंगचे खिळे मारून द्यावेत. स्लिट ए.सी. लावून घ्यावा. सर्व गोष्टींची रन टेस्ट करावी. अन्यथा नंतर पेंट खराब होतो. सर्व गोष्टींची खात्री झाल्यावर गरजेनुसार दुसरा किंवा तिसरा कोट करावा. रंग निवडताना विचार करून निवडावा. एखाद्या िभतींवर टेक्चर अथवा वॉल पेपर लावावा. जेणेकरून ती रूम उठावदार होईल.
सििलगला शक्यतो पांढरा रंग द्यावा. फॉल सििलगमध्ये एखादा पट्टा डार्क रंगाचा अथवा वॉल पेपरचा द्यावा. लहान मुलांच्या बेडरुममध्ये प्राण्याची अथवा कार्टुन्सची चित्रं लावावित. फोटोफ्रेम लावताना शक्यतो सिल लेव्हलच्या खाली लावावी. रुमच्या रंगानुसार पडद्याचे रंग निवडावेत. वापर होत असेल तरच झुंबर लावावेत. अथवा ते धूळ खात पडून राहते. लाइट फिटिंग निवडताना कमी प्रखरतेचे, कमी वीज वापरणारे एल.ई.डी. बल्ब यांचा वापर करावा. नेहमीच्या लाइटसाठी एक रंग, व डेकोरेट लाइटचा वेगळा रंग असे दोन रंग ठेवावेत. अति लाइट उदा. पलंगाखाली, सोफ्याच्या खाली, कुठे कोपऱ्यामध्ये अशा लाइट कमी ठेवाव्यात. जेणेकरून त्या गेल्यावर सहज बदलता येतील. स्पॉटलाइट घरात शक्यतो वापरू नयेत. कारण त्या मोठय़ा प्रमाणात तापतात, वीज वापरतात. सर्व रूम पॅसेजमध्ये फूट लाइट अथवा नाइट लॅम्प लावावा. जेणेकरून रात्री घरात कोणीही धडपडणार नाही.
वरील सर्व गोष्टींची काळजी घेतल्यावर तुम्ही तुमच्या घरातील गृहसजावटीची कामे चांगल्या प्रकारे करून घेऊ शकता.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
अंतर्गत सजावट करताना..
शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वत:चे घर असावे. घर घेतल्यावर कुटुंबातील सर्वाच्या गरजा व सोयीनुसार अंतर्गत रचनेमध्ये बदल करून गृहसजावट केली जाते.

First published on: 03-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During internal decoration