बंगला किंवा डय़ुप्लेक्स या प्रकारांमधील घरांचा स्टेअरकेस हा अविभाज्य भाग आहे. खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेणारा एक घटक असं याचं यांत्रिक वर्णन असलं तरी अंतर्गत सजावटीमध्ये त्याला मोलाचं स्थान आहे. त्याची अर्थपूर्ण सजावट एकूणच सजावटीत गहिरे रंग भरत असते.
आधुनिक जीवनशैलीने माणसाचं अवघं विश्वच व्यापून टाकलंय. इतकं की, अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून ते मोठय़ा गोष्टींपर्यंत त्याचा प्रभाव ठसठशीतपणे जाणवतोय. आता हेच बघा ना, आधुनिक जीवनशैली, उच्च राहणीमान याचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, घर बांधणीच्या रचनेतही तो प्रकर्षांने जाणवतोय. आधुनिकतेचा स्पर्श असणारी,  सर्व सुखसोयींनीयुक्त (मॉडर्न अ‍ॅमिनिटीज्) अशी टू बीएचके, थ्री बीएचके घरं बांधण्याबरोबरच डय़ुप्लेक्स घरं आज झपाटय़ाने आकार घेत आहेत. मोठी, प्रशस्त, ऐसपस घरं, त्यातही बंगला किंवा बंगल्याचा फील देणारी डय़ुप्लेक्स घरं ही आजची पसंती ठरतेय.
बंगला किंवा डय़ुप्लेक्स घर शास्त्रोक्त पद्धतीने सजवताना त्यातल्या स्टेअरकेसकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. बंगला किंवा डय़ुप्लेक्स यात स्टेअरकेस हा अविभाज्य घटक असल्याने त्यालासुद्धा तितक्याच आधुनिक पद्धतीने सजवणं गरजेचं असतं. खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेणारा एक आवश्यक घटक इतकंच त्याचं यांत्रिकी वर्णन असलं तरी तोही सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या शब्दाची फोड बघितली तर स्टेअर म्हणजे जिना आणि या जिन्याचं घर म्हणजे केस, स्टेअरकेस! पाच ते दहा-पंधरा पायऱ्यांचे तीन ते चार एकत्र अशा जिन्यांची मिळून स्टेअरकेस होते. घरात पोटमाळा असेल किंवा मुलांच्या खोलीत बंक बेड असेल तर त्यासाठी शिडीचा उपयोग होतो. तर दोन मजले (जमिनीच्या जास्त उंचीच्या पातळ्या) असतील तर त्यासाठी स्टेअरकेस असणं गरजेचं आहे. शिडी (लॅडर) आणि स्टेअरकेसमध्ये हाच फरक आहे.  जागेच्या उपलब्धतेनुसार स्टेअरकेस कशी असेल हे ठरवलं जातं. स्टेअरकेसमध्ये तीन प्रकार आहेत.
१) स्ट्रेट फ्लाइट – यामध्ये सरळ, एल शेप, सी शेप असे उपप्रकार आहेत. एल शेप बनविताना दोन छोटय़ा- मोठय़ा स्ट्रेट फ्लाइट घेऊन त्यामध्ये व्यवस्थित लँिडग (उतरणं) देऊन जोडल्या जातात. तर सी शेपमध्ये दोन समान लांबीच्या स्ट्रेट फ्लाइट घेऊन त्यात लँिडग देऊन जोडल्या जातात. ही स्टेअरकेस म्हणजे ईझी टू गो अप अ‍ॅण्ड डाऊन अशी असते. सामानाची चढउतार करताना अशा स्टेअरकेसमध्ये अडचण येत नाही. एका स्ट्रेट फ्लाइटमध्ये पंधरा ते सोळापेक्षा जास्त पायऱ्या असू नयेत.    
२) आर्च (वक्र) फ्लाइट – यामध्ये स्टेअरकेसचा आकार थोडासा गोलाकार / वक्र असतो. ऐसपस जागा असेल तर हा जिना खूप सुरेख दिसतो. यामध्ये हॅण्डरेलसुद्धा वक्राकार असते.   
३) स्पायरल फ्लाइट – ही स्टेअरकेस दिसायला अतिशय सुंदर दिसते. सर्कल आणि सेमी सर्कलच्या (वर्तुळ आणि अर्धवर्तुळ) केंद्र भागाच्या पिलरला (खांब) लागून स्टेअरकेसच्या पायऱ्या फिरवलेल्या असतात. मात्र या स्टेअरकेसमुळे जागा भरपूर व्यापली जाते. त्यामुळे प्रशस्त जागा असेल, आजूबाजूला व्यवस्थित मोकळी जागा  मिळत असेल तर ही स्टेअरकेस बनवावी. वयस्कर लोकांसाठी, हृदयविकार असलेल्यांसाठी तसेच सामानाची सततची ने-आण असेल तर अशा ठिकाणी या प्रकारची स्टेअरकेस फायदेशीर ठरत नाही. मात्र व्यावसायिक इमारतींमध्ये ही स्टेअरकेस उपयुक्त ठरते. स्टेअरकेसमधील प्रकारांमध्ये आमच्या दृष्टीने स्ट्रेट फ्लाइट स्टेअरकेस अतिशय उपयुक्त असून आम्ही जास्त करून याच प्रकाराला प्राधान्य देतो.
(क्रमश:)

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट