मयुर ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात भरभराट होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता पर्यंत भाजी बाजार, सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, नाटय़गृह, तरण तलाव, खेळाचे मैदान आणि क्रीडा संकुल यादी गोष्टीची उभारणी पालिकेने फार जलद गतीने केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मीरा-भाईंदर शहराचा झपाटय़ाने  होत असलेला विकास हा शहराबाहेरील नागरिकांना येथे घर घेण्यास अधिक प्रवृत्त करू लागला आहे. विशेष म्हणजे उत्तम रस्ते, उद्यान आणि उपलब्ध असलेल्या सुखसुविधांमुळे येथील सदनिकांचे दर हे पश्चिम मुंबई मधील घरांना टक्कर देऊ लागले आहेत.

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या मुंबई शहरच्या पश्चिम भागात अत्यंत जवळ असे मीरा भाईंदर शहर हे वसलेले आहे. या शहराला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. साधारण ७८.४० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या शहराचा ४० टक्के भुभाग हा  वन विभाग, कांदळवन आणि मिठागरांनी व्यापलेला आहे. तर उर्वरित ३९ टक्के भुभागात मोठय़ा प्रमाणात विकास कामे होऊ लागली आहेत. एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून मीरा-भाईंदरला ओळख प्राप्त झाली आहे. त्यामुळे मूळ आगरी-कोळी समाजाच्या नागरिकांच्या असलेल्या या भूमीत विविध राज्याच्या नागरिकांनी येणास सुरुवात केली होती. शिवाय मुंबईमध्ये काम करत असलेल्या चाकरमानी वर्गाला रेल्वेने प्रवास करून अगदी  एका तासाच्या आत घर ते ऑफिस असा प्रवास करणे सोयीस्कर होत असते.

शहरातील जलद गतीने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे  २००२ साली मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. या शहराचा विकास आराखडा हा १९९७ सालीच तयार करण्यात आला होता. वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात भरभराट होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता पर्यंत भाजी बाजार, सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, नाटय़गृह, तरण तलाव, खेळाचे मैदान आणि क्रीडा संकुल यादी गोष्टीची उभारणी पालिकेने फार जलद गतीने केली आहे. शिवाय या शहराची देश पातळीवर वेगळी ओळख निर्माण करण्याकरिता तब्बल ७९ उद्यान पालिकेने विकसित करून ‘उद्यानाचे शहर’ अशी वेगळी ख्याती प्राप्त केली आहे. त्यात पश्चिम दृतगतीमार्गाला  जोडून असलेल्या मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग- ९ चे काम देखील प्रगती पथावर सुरू असल्यामुळे  नागरिकांचा कल या शहरात सदनिका घेण्यास वाढू लागला आहे.

 दोन वर्षांपूर्वी मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाची निर्मिती होऊन त्याचे मुख्य कार्यालय मिरा रोड येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेमुक्तीच्या दृष्टीनेदेखील शहर सुरक्षित झाले आहे. याच कारणामुळे गेल्या चार वर्षांंत येथील सदनिकाचे दर हे मुंबईमध्ये असलेल्या बोरिवली, कांदविली आणि मालाड यादी शहरांना बाजार भावामध्ये मागे सोडत आहे. शिवाय सदनिकाचे दर अधिक असले तरी या ठिकाणी मोठी घर, वाहनतळाची सुविधा आणि इतर सुखसुविधा इमारतीमध्येच उपलब्ध होत असल्याने सदनिका विक्रेते आणि ग्राहक येथील सदनिकांना पंसती देत आहेत.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayandar most eligible place for property investment zws
First published on: 30-09-2022 at 01:09 IST