लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : प्रतापनगरातील उच्चभ्रू वस्तीत ‘लोटस स्पा’च्या नावावर सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यात स्पामध्ये काम करणाऱ्या तीन महिला व तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. या प्रकरणात पोलिसांनी एका महिला दलालासह तिघांना अटक केली.

मोहम्मद अल्ताफ अन्सारी ऊर्फ मोहम्मद सत्तार (२५, जयताळा बसस्टॉपजवळ) आणि ईश्वर ऊर्फ इशांत सुधीर घोरपडे (२१, सुभाषनगर) आणि आशा अशोक पाटील ऊर्फ स्नेहा विरेंद्र सौदरकर (३०, शांतीनाथ सोसायटी, जयताळा) अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-‘‘जाती-धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य द्या,” नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन

स्वावलंबीनगरातील दिनदयाल चौकात माघ अपार्टमेंटमधील चौथ्या माळ्यावर आशा पाटील ही लोटस स्पा अँड मसाज सेंटर चालवते आहे. मोहम्मद अल्ताफ आणि इशांत घोरपडे हे दोघे व्यवस्थापक आहेत. आशा पूर्वी मसाज पार्लर चालवायची. करोना काळात आर्थिक फटका बसल्यानंतर तिने लोट्स स्पा नावाने मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू केला. यासाठी मो. अल्ताफ आणि ईश्वरलाही सोबत घेतले. अल्ताफचे गॅरेज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितांपैकी दोन महिला विवाहित आहेत. एक तर उच्चशिक्षित आहे. दोन महिला मागील सहा महिन्यांपासून येथे होत्या. देहव्यसाय करून घेतला जात असल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, उपनिरीक्षक महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, सचिन बढिये, प्रकाश माथनकर, शेषराव राउत, अजय पौणिकर, पुनम शेंडे, अश्विन मागे, नितीन वासने, समीर शेख यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला व आरोपींना पकडले.