कल्याण शहरातील पाम रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ३ लाख २० हजार रुपयांची चोरी करून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. रिसॉर्टमधून चोरी करून उत्तर प्रदेशमधील आपल्या गावी पसार झालेल्या या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुनेद अन्सारी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून चोरी करण्यात आलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्याने चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.#cctv #kalyan #crime