नमस्कार मंडळी इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या २७ व्या भागात आज आपण भेटणार आहोत, युट्युबवरच्या एका कमाल जोडप्याला, म्हणजेच प्रियांका राऊत आणि प्रकाश महाजन यांना. अनेकांना आपल्याश्या वाटणाऱ्या या जोडप्याने जॉब सांभाळत, बाळाला वाढवत धावपळीतही युट्युबची वाट निवडली. या वाटेवर चालताना नात्यांच्या हळव्या बाजूसह त्यांनी स्त्री सक्षमीकरण व सामाजिक मुद्द्यांवरसुद्धा भाष्य केले आहे. अशा प्रियांका-प्रकाश यांच्या भन्नाट जोडीच्या प्रवासाविषयी व नात्यातील चढ उतारांविषयी आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत.