पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण काहीजण यातही व्यवसायाची संधी शोधत आहेत. अशीच एक संधी मुंबईतील एका व्यापाऱ्याने शोधली असून, त्याने सध्या सातत्याने चर्चेत असणाऱ्या मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी साडी मुंबईतील बाजारात आणली आहे. या साडीला मुंबईसह इतरही ठिकाणाहून मागणी येऊ लागली आहे. या साडीच्या पुनर्भेटीचा घेतलेला आढावा..