आई या शब्दात एक वेगळीच जादू आहे. संकटात मुलांच्या डोक्यावर मायेचं छत्र धरते, आपलं मूल कुठे चुकलं तर त्याला सुधारण्याची संधी देते ती ‘आई’. प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक खास स्थान असतं. त्यामुळेच तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. या दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्री शिवानी बावकरने तिच्या आईविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.