18 January 2019

News Flash

‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठकसह नवरात्रोत्सवाची धूम

नवरात्र, मुंबई आणि गरबा म्हटलं की, अनेकांच्या नजरा वळतात त्या म्हणजे बोरिवली, गोरेगाव आणि विलेपार्ले यांसारख्या भागांकडे. तसं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर गुजराती समाजबांधव असल्यामुळे नवरात्रोत्सवाची खरी धूम पाहायला मिळते ती याच भागांमध्ये.
नवरात्र उत्सवामध्ये फाल्गुनी फाटकच्या गाण्यांना अनेकांचीच निर्विवाद पसंती असते. यंदा फाल्गुनी पाठक प्रथमच गुजराती हब समजल्या जाणऱ्या बोरिवलीमध्ये तिच्या तालावर अनेकांना नाचवणार आहे. यंदाच्या नौरात्रोत्सवासाठी तिने खास तयारी केली असून ‘मैने पायल है छनकाइ’ नंतर खास गरब्यासाठी फाल्गुनी पाठकने तिचा नवा अल्बम लॉन्च केला आहे. बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या या अतिभव्य आयोजनासाठी सध्या अनेकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसोबतच काही विदेशी पाहुणेसुद्धा हजेरी लावणार आहेत.
यंदाचा नवरात्रोत्सव अकरा दिवसांसाठी आला आहे, त्यामुळे गरब्याची ही धूम आणखीनच जास्त रंगणार असेच दिसत आहे.

आणखी काही व्हिडिओ