करोना विषाणूंचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.