शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काल (१७ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकाल दिला की, समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. दोन गद्दरांचे गट एकत्र आले, तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केलीये. नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचा कायदा मानत नाहीत. ते स्वतःचा पर्सनल लॉ मानतात. पर्सनल लॉवर कायदा चालत नाही”