पुणे जिल्ह्यातील मुदत संपणार्या २३१ पैकी १८६ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक, तर १४२ पैकी ३१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक काल (५ नोव्हेंबर) पार पडली. आज हवेली तालुक्यातील कोलावडे साष्टे ,खामगाव मावळ येथील मतमोजणी मामलेदार कचेरी येथे पार पडली.तर या निवडणुकीत हवेली तालुक्याने महायुतीला नाकारत शरद पवारांच्या विचाराच्या पॅनलला मतदान केल्याचे पाहण्यास मिळाले.पेठ 2 सदस्य पदासाठी पल्लवी सुरज चौधरी, आळंदी म्हटोबा १ सदस्य पदासाठी शंकर शिवाजी जवळकर आणि हिंगणगाव १ सदस्य पदासाठी मंगल थोरात हे विजयी झाले आहेत.