गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्या अटकेच्या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे” असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.