Pune BJP Celebration on Results: तीन राज्यांतील विजयानंतर पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष!
छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपानं छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये विजय मिळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपाचे पदाधिकारी जल्लोष साजरा करत असून पुण्यातील गुडलक चौकात भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्त्वाखाली लाडू वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला.