आगामी लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणकीची मतमोजणी आज, रविवारी होत आहे. राजस्थानमध्ये भाजपाने शंभरी पार केली असून, मध्य प्रदेश, तेलंगणामध्येही भाजपाची घोडदौड सुरू आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, या निवडणुकीत चारही राज्यांतील दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असून, दुपापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.