Mahua Moitra Expelled From Lok Sabha: तृणमूलच्या महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!, प्रकरण काय?;
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. या समितीने अहवाल दिला असून त्यात त्या दोषी आढळल्या. या प्रकरणावर आज संसदेत चर्चा झाली आणि मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आलीये.