Sanjay Raut on Shinde-Fadnavis: “भाजपाकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का?”; संजय राऊतांचा सवाल
महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. पेशवे काळात घाशीराम कोतवालावर पुण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र तो लूटमार करायचा, अनागोंदी माजवली होती. तशाच प्रकारे सध्याच्या घडीला राज्यकारभार सुरु आहे असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. काही वेळापूर्वीच माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.