Pandharpur: एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीला तब्बल सातशे मीटर लांबीची महाकाय साडी चंद्रभागेस अर्पण!
वारकरी संप्रदायामध्ये श्री विठ्ठलाप्रमाणे चंद्रभागेला देखील अनन्यसाधारण महत्त्व असल्याने चंद्रभागेची साडी चोळीने ओटी भरण्याची परंपरा असल्याने आज (९ डिसेंबर) एकादशी निमित्ताने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महिलांनी वेगवेगळ्या शंभर साड्या एकत्र करत विधिवत पूजा करुन तब्बल सातशे मीटर लांब अशी महाकाय साडी चंद्रभागेस अर्पण केली. या महाकाय साडीमुळे चंद्रभागेचे पात्र विविध रंगात नाहून निघाले होते हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.