गेल्या कित्येक महिन्यांपासू मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी समाजाच्यावतीने भूमिका मांडत आहेत. मात्र त्यांच्या या भूमिकेवर आता किर्तनकार अजय बारस्कर यांनी आक्षेप घेतला आहे. बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या लढ्यात सहकार्य करणारे सहकारी होते. अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हेकेखोर असल्याचे आरोप केले. तसेच मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचाही आरोप बारसकर यांनी केला.