राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. बारामतीमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असतानाच सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.