जालना लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांचं नाव पुढे केलं जात आहे. यासंदर्भातील प्रस्तावही वंचितने मनोज जरांगेंना पाठवला होता. शिवाय हा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. त्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.