राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budegt session) सुरू आहे. बुधवारी (२८ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत सुरू असलेल्या भ्रष्ट्राचारावर विधानपरिषदेत भाष्य केलं. भ्रष्ट्रचाराचा मॅाल उघडला आहे, असं विधान त्यांनी यावेळी केलं. तसंच मुंबईतील डान्सबारचा विषय मांडतानाच मुंबई पोलीस प्रशासनावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत.