“एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. दादांच्या (विजयसिंह मोहिते पाटील) सांगण्यावरून लोकांनी तुला एका रात्रीत आमदार केला. आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, असा इशारा मोहिते पाटलांनी राम सातपुतेचं नाव न घेता दिला आहे. अकलूजमध्ये शरद पवार गटात पक्षप्रवेश करताना धैर्यशील मोहिते पाटलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.