२०१९मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. तेव्हा एकमताने उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आलं. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. त्याबद्दल शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये खुलासा केला आहे.