डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी फेझ दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. स्फोटामुळे या कंपनीला भीषण आग लागली असून त्याची झळ आसपासच्या परिसरातील दुकानं, मंदिर आणि रहिवासी इमारतीला बसला आहे. स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.