मनसे व शिवसेनेच्या दृष्टीने मुंबईतील माहीम हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ. अस्सल मराठमोळा दादरचा परिसर मतदारसंघात मोडतो. मतदारसंघ फेररचनेत दादरचा माहीम मतदारसंघ झाला. गेल्या वेळी मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेतून ऐनवेळी काँग्रेसमध्ये गेलेल्या सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. आता सरवणकर सेनेत परतले असून, त्यांचा सामना सरदेसाईंशी आहे.
बलस्थान
शांत, संयमी व्यक्तीमत्त्व, राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, मतदारसंघातील सर्व नगरसेवक मनसेचे
कच्चे दुवे
कार्यकर्त्यांशी थेट संपर्क कमी, लोकसभेला माहीममध्ये मनसे मोठय़ा प्रमाणात पिछाडीवर.
बलस्थान
तळागाळातला कार्यकर्ता, जनतेशी थेट संपर्क, मतदारसंघाचे पूर्वी प्रतिनिधित्व केले.
कच्चे दुवे
शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गेल्या वेळी पक्ष बदलला पक्षबदलाने जुन्या कार्यकर्त्यांशी संपर्क कमी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विलासकाका पाटील-उंडाळकर
सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीने चर्चेत आहे. आठ वेळा विजयी झालेले काँग्रेसचे विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी पक्षाविरुद्ध बंड करत पृथ्वीराजबाबांना आव्हान दिले आहे. भाजपने तरुण कार्यकर्ते अतुल भोसले यांना, तर शिवसेनेने डी. वाय. पाटील यांचे पुत्र अजिंक्य यांना उमेदवारी देऊन लढतीतील रंगत वाढवली आहे.
बलस्थान
मुख्यमंत्री असताना विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघात केलेली विकासकामे. पारंपरिक मतदार, चांगली प्रतिमा
कच्चे दुवे
थेट कार्यकर्त्यांशी संपर्क कमी, राष्ट्रवादीचा विलासकाका पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा.

बलस्थान
गावोगावी उत्तम जनसंपर्क, केलेली कामे, कार्यकर्त्यांचे जाळे, सातारा जिल्ह्यातील मोठय़ा सहकारी संस्थांवर प्रभुत्व.
कच्चे दुवे
काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने अडचण
सतत आमदार राहिल्याने प्रस्थापितविरोधी लाटेची भीती.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big fights in maharashtra assembly elections
First published on: 14-10-2014 at 04:03 IST