महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातील पंचरंगी लढतींचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली असून या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात अनेक उत्कंठावर्धक निकाल अपेक्षित आहेत. या सगळ्याचे लाईव्ह अपडेटस् पुढीलप्रमाणे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* दहिसरमध्ये भाजपच्या मनीषा चौधरींकडून सेनेच्या विनोद घोसाळकरांचा पराभव
* मुंबईत भाजप-१७, शिवसेना-१०, काँग्रेस-६, राष्ट्रवादी आणि मनसेची एका जागेवर आघाडी
* अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचा 1000 मतांनी पराभव, शिवसेनेचे तुकाराम काते विजयी
* पालघरमध्ये शिवसेनेचे विजय घोडा विजयी
* ऐरोली मतदासंघात राष्ट्रवादीचे संदीप नाईक विजयी
* बेलापूरमध्ये गणेश नाईकांना पराभवाचा धक्का, भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी
* ठाण्यात संजय केळकर 12588 मताधिक्याने विजयी; रविंद्र फाटक पराभूत
* दिंडोशीतून शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी
* गोरेगावमध्ये शिवसेनेला पराभवाचा धक्का, सुभाष देसाई पराभूत
* मुंबईत एमआयएमचा शिरकाव; भायखाळ्यात वारिस पठाण विजयी
* धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
* जोगेश्वरी पूर्व मधून सेनेचे रविंद्र वायकर 29000 मतांनी विजयी
* कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेचे एकनाथ शिंदे 51000 मतांनी विजयी, भाजपचे संदीप लेले पराभूत
* वरळीतून राष्ट्रवादीचे सचिन अहिर पराभूत, शिवसेनेचे सुनील शिंदे यांचा 24,000 मतांनी विजयी
* माहीम मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून मनसेच्या नितीन सरदेसाईंचा पराभव
* मुंबईत शिवसेना 12, भाजप 17 , काँग्रेस 3, आणि मनसे दोन आणि राष्ट्रवादी एका जागेवर आघाडी
* बोरिवली मतदारसंघातून भाजपचे विनोद तावडे विजयी
* घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे राम कदम विजयी
* बोरिवली मतदारसंघात सातव्या फेरीअखेर विनोद तावडे 28654 मतांसह आघाडीवर
* ओवळा- माजिवाडा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर भाजपचे संजय पांडे 23639 मतांसह आघाडीवर
* मुलुंडमध्ये भाजपचे सरदार तारासिंग विजयी
* नालासोपारा- हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकरू पिता-पुत्रांचा विजय निश्चित
* वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपचे आशिष शेलार आघाडीवर
* भायखाळ्यात मनसेचे संजय नाईक आघाडीवर
* माहिम मतदारसंघात मनसेचे नितीन सरदेसाई आघाडीवर
*मुंबईत शिवसेनेची पिछेहाट, भाजपची सातत्यपूर्ण आगेकूच
* मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे पिछाडीवर
* अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे नवाब मलिक पिछाडीवर
* घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचे राम कदम आघाडीवर
* धारावी मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर
* भायखाळ्यातून भाजपचे मधू चव्हाण आघाडीवर
* मुंबईत शिवसेना 10, भाजप 17 , काँग्रेस 6, राष्ट्रवादी आणि मनसेला एका जागेवर आघाडी
* शिवडी मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर 8000 मतांनी पिछाडीवर
* बेलापुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नाईक आघाडीवर
* मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचे अबु आझमी पिछाडीवर
* दुसऱ्या फेरीअखेर कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या सुभाष भोईरांना 10,446 मतांची आघाडी
* विक्रोळी मतदारसंघात मनसेचे विद्यमान आमदार मंगेश सांगळे पिछाडीवर
* मुंबईत शिवसेना 15, भाजप , काँग्रेस 6, राष्ट्रवादी आणि मनसेची दोन जागांवर आघाडी
* कांदिवली पूर्व मतदारसंघात अतुल भातखळकर पिछाडीवर
* दहिसर- विनोद घोसाळकर आघाडीवर
* मागाठण्यातून सेनेचे प्रकाश सुर्वेंना 4000 मतांची आघाडी
* कल्याण-ग्रामीणध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर 3000 मतांनी पुढे
* घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपचे प्रकाश मेहता 4000 हजार मतांनी आघाडीवर
* वांद्रे-पश्चिमधून भाजपचे आशिष शेलार आघाडीवर
* ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे आघाडीवर
* मुंबईत शिवसेना 13, भाजप 8, काँग्रेस 3 आणि मनसेची दोन जागांवर आघाडी
* गोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष देसाई मागे
* ठाण्यात रविंद्र फाटक पिछाडीवर
* बेलापूरमधुन राष्ट्रवादीचे गणेश नाईक पिछाडीवर
* ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे आघाडीवर
* गोरेगाव मतदारसंघात शिवसेनच्या सुभाष देसाईंची सरशी
* बोरिवलीतून भाजपचे विनोद तावडे आघाडीवर
* पनवेल मतदारसंघात प्रशांत ठाकूर यांची आघाडी
* मुंबईत शिवसेना 11, भाजप 5, काँग्रेस 2 आणि मनसेची एका जागेवर आघाडी
* नवी मुंबईच्या ऐरोलीतही सेनेचे विजय चौगुले आघाडीवर
* शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकरांना धक्का, सेनेच्या अजय चौधरींची आघाडी
* मुंबईतील प्रारंभीचे कल शिवसेनेच्या बाजूने, 10 जागांवर आघाडी
* धारावी मतदारसंघातून सेनेचे बाबुराव माने पुढे
* चांदिवलीमधून काँग्रेसचे नसीम खान आघाडीवर
* मुंबईतील 36 मतदारसंघापैकी चार जागांवर भाजप पुढे
* माहीम मतदारसंघात सेनेचे सदा सरवणकर आघाडी
* घाटकोपर पूर्व मतदारसंघात प्रकाश मेहता आघाडीवर
* घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपेच राम कदम आघाडी
* शिवसेना सात आणि भाजपची दोन जागांवर आघाडी
* शिवसेना पाच आणि भाजप एका जागेवर आघाडी
* मुंबईत तीन जागांवर शिवसेना आघाडीवर

More Stories onठाणेThane
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election result 2014 in mumbai thane
First published on: 19-10-2014 at 08:15 IST