महाराष्ट्राचा कृषी विकासदर आघाडीवर होता, या राज्याचे कृषिमंत्री शरद पवार हे असूनही त्यांना राज्याचा कृषिविकास दर टिकविता आला नाही. अशी टीका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पनवेल येथील जाहीर सभेत शरद पवारांवर केली. स्वराज म्हणाल्या की, राज्यात कृषिक्षेत्राचा विकासाचा आलेख चढण्याऐवजी त्या आलेखाने नीचांक गाठला. त्याउलट, मध्य प्रदेशने कृषी विकासदरात वाढ केल्याने कृषिमंत्र्यांना त्यांच्याच हस्ते कृषिकर्मण पुरस्कार द्यावा लागला हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पनवेल मतदारसंघातील उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी सुषमा स्वराज खारघर येथील गुडविल मैदानावर आल्या होत्या. स्वराज यांनी या वेळी शिवसेनेला सल्ला देताना आम्ही मातोश्री आणि बाळासाहेबांचा आदर करतो, त्या आदराचा भंग करू नका, अशा  शब्दांत शिवसेनेला समयसूचकतेचा इशारा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रात आलेल्या अफझलखानांच्या फौजा अशी टीका प्रचारादरम्यान केली होती.