कोणाला मिळू लागलंय काय माहीत? तिकिटाचं काय बी सांगता येत नाही. आता आम्ही खासदारंय पण सांगता येईना कोणालाच. कोणी काही सांगितलं की कान देऊन ऐकायचं. एवढी नावं की यादी करून

डकवावं लागलं. निकाल बघताना कशी झुंबड उडतीय तसं हाय हो हे. घटकंत एक तर घटकंत दुसरंच नाव घेत्यात. आता सगळय़ा मराठवाडय़ात एकेक आयएस अधिकारी उतरवणारयत म्हणं. धारशिवला परदेशी, हिंगोलीला मोपलवार, असं नावंच नावं. प्रत्येकजण एक लिस्ट घेऊन फिरू लागलाय. पण आमच्या पक्षातलं कोणालाच काही समजत नाही. हिथं फक्त दोघांनाच सगळं माहीत. त्यांच्या मनात काय, हाच खरा प्रश्न आहे.

uddhav thackeray pm narendra modi (8)
ठाकरे गटाच्या गाण्यातील ‘या’ शब्दांवर आयोगाचा आक्षेप; उद्धव ठाकरे म्हणतात, “…तोपर्यंत आमच्यावर कारवाई करता येणार नाही!”
What Sanjay Raut Said?
संजय राऊत नवनीत राणांबाबतच्या विधानावर ठाम! “नाचीला ‘नाची’ नाही तर मग…?”
minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
Mahayuti candidate Shrirang Barne reacts on What will be the challenge of the opposition candidate
पिंपरी : विरोधी उमेदवाराचे आव्हान किती असेल? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, उमेदवार कोण…!

तक्रार ऐकल्याचे समाधान

‘विवेका’ची एक बैठक भरली होती म्हणे. धोरण वकिली संशोधन केंद्रात मग सारे सहभागी झाले. विविध जातीचे, सेवा क्षेत्रात काम करणारे, विविध तज्ज्ञांनी सरकारने काय करावे, याचे सल्ले दिले. प्रत्येक विभागात या बैठका झाल्या. या बैठकीला मराठवाडय़ाच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या दहशतीची जोरदार चर्चा झाली. अल्पसंख्याक विभागाच्या या मंत्र्यांचे अनेक प्रताप सरकारमध्ये चर्चेत होते. आता ते खास बैठकीतही चर्चेत आले म्हणे. सिल्लोडच्या एकाने मंत्री महोदयाच्या वर्तणुकीमुळे अनेकांना गाव सोडावे लागत असल्याची माहिती सरकारच्या कानावर टाकली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे खास दूत आले होते. अन्य एक कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. एका मंत्र्याच्या तक्रारीवर दुसरे मंत्री शांत राहिले. एकाला तक्रार केल्याचे समाधान, तर दुसऱ्याला तक्रार ऐकल्याचे समाधान.

काका-पुतण्यांचे असंही तसंही..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्या वेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने मुलाखतीचे आयोजन केले होते. अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी ती रंजक करण्याचा प्रयत्न केला. अर्थात भर राहिला तो काका-पुतण्यातील बदलत्या नातेसंबंधावर. अजित पवार यांनीही कधी आक्रमक होत तर कधी जुळते घेत प्रश्नांना भिडत राहिले.

भल्या सकाळी तालमीला भेट दिल्याचा संदर्भ देऊन लंगोट घालून तयार आहे; समोर याच, असे म्हणत सुरुवातीलाच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले. मात्र, राजकारणात निवृत्तीचे वय काय असले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर देताना सावध होत अजितदादांनी इतकी चांगली मुलाखत सुरू आहे. त्यात मिठाचा खडा कशाला, असे उत्तर देताना काकांना सांभाळून घेतल्याचे जाणवल्याने सभागृहात हशा पिकला.

एकही भूल.!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षबांधणीसाठी सोलापुरात धूमधडाक्याचा दौरा झाला. रात्री माजी आमदार दिलीप माने यांच्या शेतघरावर झालेल्या हुरडा पार्टीसाठी ते आवर्जून आले होते. त्यामुळे माने हे नेमक्या कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, याची चर्चा सुरू आहे. बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल, करमाळय़ाच्या रश्मी बागल यांनाही ‘एकही भूल’ हानिकारक ठरली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभेची जागा लढविण्याची तयारी करताना काँग्रेसच्या ‘हाता’ची साथ घेण्याची दिलीप माने यांची मानसिकता आहे. परंतु तरीही जोखीम नको म्हणून ते अन्य पक्षांची चाचपणीही करीत आहेत. पवार यांच्यासाठी उडविलेला हुरडा पार्टीचा बार हा त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. परंतु विधानसभा लढवायची तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे वास्तवही त्यांच्यासमोर आहे.

उच्च शिक्षणमंत्री आणि प्राचार्याची शिस्त

हल्ली उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भलतेच खुशीत दिसतात. कार्यक्रमाला गेले की संयोजकांच्या मागण्या विनाविलंब मंजूर करण्याची शैली त्यांनी अवगत केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनात सर्व प्रलंबित मागण्या मंजूर करतो, अशी ग्वाही देऊन शासकीय कामाची पद्धत पाहता काही वेळा सहा महिने थांबावे लागेल याची जाणीव करून दिली. तोवर एक प्राचार्य उठून काही सांगू लागले. त्यावर दादांनी प्राचार्यानी असे बेशिस्त वागू नये, असे म्हणत शिस्तीची जाणीव करून दिली. लगेचच सांभाळून घेत, बोला काय म्हणायचे आहे? अशी विचारणा केली. तीन महिन्यांत हे काम व्हावे अशी अपेक्षा त्या प्राचार्यानी बोलून दाखवली. दप्तर दिरंगाई हा प्रकार नसता तर तीन दिवसांतच काम केले असते, असे सांगत दादांनी शेजारीच बसलेले शून्य प्रलंबितता कामाचे संकल्पक, ‘रयत’ संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांची या कामाबद्दल पाठ थोपटली.

(संकलन – सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, एजाजहुसेन मुजावर)