News Flash

व्हिवा वॉल : सिनेमा सिनेमा

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा.

| February 21, 2014 01:08 am

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
‘लव्ह इज इन द एअर..’ असं म्हणत फेब्रुवारी महिना उजाडतो नि त्याची जणू लागणच एंटरटेण्टमेंट इंडस्ट्रीला होते. इतरांसाठी ‘व्ही डे’चा फिव्हर त्याच दिवशी संपत असला तरी बऱ्याचदा त्याच्या आगेमागे अनेक प्रेमपट, मसालापट, रहस्यपट वगरे प्रदíशत झाल्येत नि होताहेत. विविध चित्रवाहिन्याही याला अपवाद नसतात. त्यामुळं गाजलेल्या देशी-विदेशी लव्हस्टोरीजपासून ते मधुर मधुबालाच्या चित्रपटांच्या मेजवानीपर्यंत बरेच चित्रपट घरबसल्याही पाहायला मिळतात. त्याखेरीज हा मूड आणखीन बरकरार ठेवण्यासाठी सीडीज-यूटय़ूबचा सहारा असतोच.
 सध्या ‘पाठलाग निरागस स्वप्नांचा’ म्हणत दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘फँड्री’ खूप गाजतोय. जोरदार प्रोमोज नि अजय-अतुलच्या थीम साँगमुळं उत्सुकता, देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवात पुरस्कारांसह आपल्याकडील अनेक मान्यवरांनी मन:पूर्वक दिलेली दाद हे ‘फँड्री’चे प्लस पॉइंटस्. पोस्टरवरूनच प्रेमपट दिसणाऱ्या नि प्रेमाची परिभाषा नव्यानं मांडू पाहणाऱ्या ‘प्रियतमा’लाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. त्याआधी आलेला ‘संघर्ष’ केवळ एक मसालापट ठरला. तगडी स्टारकास्ट असूनही निराशाच झाली. आता आज रिलीज होणाऱ्या शिल्पा शिरोडकरची पहिलीच निर्मिती असणाऱ्या ‘सौ. शशी देवधर’ या रहस्यपटाविषयी अनेकांना उत्सुकता वाटत्येय. एरवी ग्लॅमरस दिसणारी सई ताम्हणकर मध्यमवर्गीय स्त्रीच्या भूमिकेत झळकणारेय.
 ‘हसीं तो फसीं’मधले परिणिती नि सिद्धार्थ मल्होत्रा अनेकांना भावलेत. सिद्धार्थसाठी तर निर्मात्यांच्या रांगा लागल्याची चर्चा आहे. ‘अ वेक’ या अमेरिकन चित्रपटावर बेतलेल्या नि शेखर सुमनचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘हार्टलेस’ला बरा प्रतिसाद मिळालाय. सल्लूभायच्या ‘जय हो’नं साफ निराशा केली असली तरी त्याचा ‘हेल्प फंडा’ काहींना भावलायही. ऐंशीच्या काळातलं नाटय़ उभं करणाऱ्या ‘गुंडे’त दोन मित्र माफिया नि पोलीस अधिकारी असा ट्रँगल जमवलाय. आज रिलीज होणाऱ्या ‘हाईवे’विषयीही मोठी उत्सुकता लागून राहिल्येय. ‘रॉकस्टार’नंतर प्रदíशत होणारा इम्तियाज अलीच्या या चित्रपटाला ए. आर. रहमाननं संगीत दिलेली गाणी चांगलीच गाजताहेत. नव्या पिढीचा चित्रपट असणाऱ्या ‘हाईवे’मध्ये रोमान्स नि ड्रामा ठासून भरलेला आहे आणि हो, ‘शादी के साइड इफेक्टस्’ असं म्हणत फरहान अख्तर नि विद्या बालन सॉलिड धुमाकूळ घालणार, असं दिसतंय. आपण पाहिलेल्या चित्रपटाविषयीचं मत काही जणींनी ‘व्हिवा वॉल’शी शेअर केलंय.

समीक्षा कदम
‘हसीं तो फसीं’ मूव्हीमध्ये परिणितीची अ‍ॅिक्टग सुपर्ब आहे. स्वत:च्या करिअरसाठी काहीही करण्याची तयारी दाखवणारी मुलगी आणि स्वत:च्या वडीलधाऱ्यांविषयी अपार प्रेम दाखवलंय त्यात.. सिद्धार्थची अ‍ॅिक्टग पण मस्त आहे, पण त्याचं कॅरेक्टर थोडं कन्फ्युजिंग दाखवलंय. गाणी एकदम मस्त आहेत. स्पेशली ‘झेहनसीब’ आणि ‘ड्रामा ‘क्वीन’ ही दोन्ही गाणी छानच आहेत. ऑलओव्हर एकदा पाहण्यासारखी मूव्ही आहे. दोघांची केमिस्ट्री मस्त दाखवल्येय. आधी फ्रेण्डस्. मग बेस्ट फ्रेण्डस्. आणि मग लव्हर्स.. सिंपल बट क्युट.

स्वाती वास्ते
‘गुंडे’ ही मूव्ही ओव्हरऑल नाइस. रणवीर सिंग आणि अर्जुन या दोघांनी चांगला अभिनय केलाय. पण रणवीर सिंग जास्त छान वाटलाय. प्रियांका चोप्राही फार छान दिसल्येय. सस्पेन्स चांगला होता खरा, पण तो कॉमन होता. ‘धूम२’मध्ये ऐश्वर्यानं चोराला पकडायला पोलिसांना मदत केली होती, त्याचप्रमाणं प्रियांकानंसुद्धा फितुरीचं काम केलंय. फरक एवढाच की ‘गुंडे’मध्ये प्रियांका स्वत: पोलीस ऑफिसर दाखवल्येय. यातल्या रणवीर नि अर्जुनच्या मत्रीला सॅल्युट. ‘जिया रे’ नि ‘तुने मारी एन्ट्रिया’ ही गाणी छान आहेत. मूव्हीत रणवीर नि अर्जुन परिस्थितीमुळं गुंडे झाले. ते दोघं स्वत:च्या हक्कांसाठी लढलेत.

आसावरी दीक्षित
‘हसीं तो फसीं’ची स्टोरी मला इतकी खास नाही वाटली. पण हिरो-हिरॉइन आवडीचे असल्यामुळं मी मूव्ही बघायला गेले. मी मूव्ही रोजच्या बिझी आणि स्ट्रेसफुल लाइफमध्ये थोडा विरंगुळा म्हणून बघते. त्यामुळं मला खूप कॉम्पिकेटेड मूव्हीज नाही आवडत. सिंपल रिलॅिक्सग पण थोडंसं काहीतरी शिकवून जाणाऱ्या मूव्ही बघितल्या की फ्रेश फिल होतं. त्यानुसार ‘हसीं तो फसीं’ला मी ७/१० पॉइंटस् देईन.

नेहा बांदिवडेकर
‘धर्मा प्रॉडक्शन’ बॅनर असल्यानं आणि मित्रमंडळींकडून मिक्स रिव्ह्य़ूज ऐकून मी ‘हसीं तो फसीं’ला गेले. स्टोरीलाइन थोडी वेगळी होती आणि ती करंट यंग जनरेशनला सूट होती. एक रोमँटिक-कॉमेडी आणि टिपिकल फिल्मी टच असणारी मूव्ही. पण मूव्हीचं ‘टायटल’ नि स्टोरीचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही असं मला वाटलं. गाणी आणि संवाद खूपच मनोरंजक. ओव्हरऑल अ टू स्टार मूव्ही.

चैताली खांडेकर
बॉलीवूडमध्ये फ्रेंडशिपवरचे अनेक मूव्हीज आतापर्यंत येऊन गेल्येत. ‘गुंडे’ हा त्यातलाच एक असला तरी तो बघून मी काही एक्साइट वगरे झाले नाहीये. वेळ नि पसावसूल या दृष्टीनं पाहिलं तर त्यातल्या त्यात रणवीर नि अर्जुनच्या लहानपणीच्या व्यक्तिरेखा साकारणारी बच्चे कंपनी आणि इरफान खान यांचा परफॉरमन्स चांगला होता. त्याशिवाय संकलन आणि संवादलेखकांची कामगिरीही चांगली होती. ऑडियन्सनं मूव्ही एन्जॉय केली, ही गोष्ट ‘गुंडे’साठी विन विन सिच्युएशन ठरली.

मालविका शर्मा
मला ‘जय हो’मधली अ‍ॅक्शन आवडली, पण स्टोरीलाइनमध्ये गरज नसताना हिरॉइन उगाच घेतली, ही गोष्ट आवडली नाही. ‘जय हो’कडून अपेक्षा खूप होत्या, पण निरस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:08 am

Web Title: cinema cinema
Next Stories
1 लिव्ह वेल डाएट
2 ओपन अप : जॉब नसण्यातला आनंद
3 स्लॅम बुक : मधुरा वेलणकर
Just Now!
X