गायत्री हसबनीस viva@expressindia.com

गेल्या आठवडय़ापासून फेसबुक वापरकर्त्यांना आलेल्या नोटिफिके शनमधून या माध्यमावरील अभिव्यक्तीच्या स्वरूपात काही बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. फेसबुक च्या नियम आणि अटींनुसार आक्षेपार्ह ठरणारा मजकू र, शब्द, व्हिडीओ यांना कात्री लागणार आहे. हे नवे निर्बंध नेमके  काय आहेत? या नव्या बदलामुळे यापुढे तरुणाईला जबाबदारीने, विचारपूर्वक पोस्ट टाकाव्या लागतील का?

लॉकडाऊन काळात एकमेकांशी जोडलेले राहण्याचे, संवाद कायम ठेवण्याचे, अभिव्यक्तीचे आणि क्वचितप्रसंगी मनोरंजनाचे साधन म्हणून सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढेही काळानुसार सोशल मीडियाचा हा महिमा वाढता राहणार आहे. कोणतेही निर्बंध न ठेवता अभिव्यक्तिस्वातंत्र्य देणारी ही माध्यमे तरुणाईत लोकप्रिय झाली नसती तरच नवल! मात्र गेल्या आठवडय़ापासून फे सबुक वापरकर्त्यांना आलेल्या नोटिफिके शनमधून या माध्यमावरील अभिव्यक्तीच्या स्वरूपात काही बदल होण्याचे संके त मिळाले आहेत. फे सबुक च्या नियम आणि अटींनुसार आक्षेपार्ह ठरणारा मजकू र, शब्द, व्हिडीओ यांना कात्री लागणार आहे. हे नवे निर्बंध नेमके  काय आहेत? या नव्या बदलामुळे यापुढे तरुणाईला जबाबदारीने, विचारपूर्वक पोस्ट टाकाव्या लागतील का?

सायबर कायदेतज्ज्ञ आणि कायदेविषयक अभ्यासक अ‍ॅड. प्रशांत माळी सांगतात, फेसबुकच्या नियम आणि अटींप्रमाणे असे काही शब्द, व्हिडीओ आणि मजकूर जे संवेदनशील आहेत ते फेसबुकवरून काढून टाकले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने र्पोनोग्राफिक मजकूर, आत्महत्येचा व्हिडीओ, खुनाचा व्हिडीओ, बॉम्ब बनवण्याचा व्हिडीओ, आरडीएक्स हा शब्द, धर्मगुरू तसेच राजकीय नेत्यांबद्दल काही गैरशब्दप्रयोग यांचा समावेश आहे. यामुळे पहिल्यांदा सोशल मीडियावर प्रत्येक जण कुठल्यातरी समुदायाचा घटक असतो हे लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर तरुण पिढीने किती सजग राहून सोशल मीडिया वापरायला हवा हा मुद्दा उपस्थित होणं अपरिहार्य आहे, असं ते सांगतात. कोणत्याही प्रकारच्या ग्रुप आणि ‘कम्युनिटी पेज’वर तरुण मुलं सहभागी होणार असतील तर त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्या ग्रूपमध्ये त्यांनी सामील व्हावं, असा सल्ला मी देईन. कोणत्या व्हिडीओला, पोस्टला आपण लाईक, कमेंट  करतोय या सर्वांचा विचार करणेही आवश्यक असून सोशल मीडियावर बरेच चॅटिंग ग्रुप असतात. या ग्रुप्समध्ये कोणीही अ‍ॅड होऊ शकतं हे लक्षात घेऊन आपल्या अकांऊटच्या सेटिंग्जमध्ये बदल करणंही गरजेचं आहे असं माळी सांगतात.

सोशल मीडिया हे कम्युनिटी माध्यम असल्याने जगभरातील अनेक जण या माध्यमाचा वापर करतात. तरुणांच्या हाती या मोफत आणि मुक्त मानल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा योग्य वापर करून व्यक्त होणं किती गरजेचं आहे हे सांगताना ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’चे उन्मेष जोशी म्हणतात, ‘जसं सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा ‘विरोध’ करण्याला विरोध नाही तसंच त्या विरोधाचं पर्यवसान दुसऱ्या व्यक्तीसाठी गुन्हा याअर्थी असू शकतो, यासारख्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. एकीकडे विरोध करताना तो योग्य शब्दरूपात करावा हा सगळ्यांचा अधिकार आहे, आपण ज्या कुठल्या माध्यमात सक्रिय असू तेथून वैचारिक विरोध करू शकतो. परंतु दुसरीकडे बऱ्याचदा योग्य शब्दात विरोध न मांडणं, एखाद्या घटनेचा सर्वांगाने विचार न करणं,  आपली मतं चुकीच्या शब्दांत मांडणं हे सर्रास के लं जातं. याची जबाबदारी एक ‘नेटिझन’ म्हणून सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे असं ते सांगतात. अनेकदा आपण विरोध करतो तेव्हा त्या विरोधामागील कारण समजून न घेताच तुम्ही अमुक एका घटनेला विरोध केलाय म्हणून ‘ट्रोल’ केलं जातं. वैचारिक विरोध असणं हे सुदृढ समाजाचं लक्षण आहे, त्यामुळे योग्य प्रकारे व्यक्त होण्याचे धडे मुलांना दिले गेले तर सोशल मीडिया हा एकप्रकारे आरसा आहे, ज्यातून आपले प्रतिबिंब जगासमोर येते हे तरुणाईच्या लक्षात येईल, असं ते सांगतात. मोठमोठय़ा कंपनीतील एच.आर डिपार्टमेंट हे तरुण मुलांच्या सोशल मीडियावरील विचारांवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या कर्तृत्वाबरोबरच त्यांचे विचारही जोखले जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सोशल मीडियावर एखाद्या घटनेवरून काही गंभीर गाजावाजा झाला की संबंधित सोशल मीडियाला कारणीभूत ठरवलं जातं. फेसबुकच्या नियमाप्रमाणे, तेरा वर्षांवरील मुलं जर फेसबुक वापरणार असतील तर फेसबुकनेच त्यांनी कसं संवेदनशील राहून व्यक्त झालं पाहिजे याबद्दल जागृती करणे आवश्यक आहे, असं उन्मेष जोशी म्हणतात. वास्तविक माध्यमं जनजागृतीसाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. सरकारच्या दबावाखाली किंवा आंदोलनं झाली की ही माध्यमं सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात, असंही ते म्हणतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा येतो तेव्हा कुठल्याही ‘मोकळीक’तेस काही मर्यादा आणि बंधनं प्रत्यक्षात असतातच, त्यामुळे जर अभिव्यक्तिस्वातंत्र्यातून आपण कोणाला दुखावत असू तर तसा विचार सगळ्यांनी करायला हवा आणि विशेषत: हा मुद्दा कुठलाही मजकूर टाकताना तरुणांनी आणि सर्व सोशल मीडिया युजर्सनी करून घ्यायला हवा. माध्यमांची जबाबदारीही अधिक असते कारण सोशल मीडियाच्या एकूणच तांत्रिक बाबींचा मुद्दा येतो तेव्हा फेसबुक म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप हे पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते, उदाहरणार्थ फेसबुकने जर काही शब्द, मजकूर गंभीर स्वरूपाचे आहेत याची तांत्रिकदृष्टय़ा नोंद केली असेल तर त्यानुसारच एखाद्या मजकु राची विल्हेवाट लावली जाईल, असं प्रशांत माळी सांगतात.

एकीकडे जनमानसात नियम आणि अटी न वाचताच एखादं अ‍ॅप मोफत मिळतंय म्हणून सरसकट वापरणं ही लोकांची सहजवृत्ती असल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्या फेसबुकप्रमाणे इतर माध्यमंही स्वत:चे असे नियंत्रण किं वा नियम घेऊन येऊ शकतात. हे लक्षात घेत तरुणाईने उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीनुसार ‘उचलला कन्टेन्ट केला पोस्ट’ असं न करता अधिक सजगपणे, विचारपर्वूक आणि जबाबदारीनेच आपले विचार, मत पोस्ट के ली पाहिजेत, असं स्पष्ट मत तज्ज्ञ मांडतात.