सणांच्या दिवसात उपयोगी पडेल असे एथनिक फॅशनचे स्टाइल गाइड खास तुमच्यासाठी भारतातील सणासुदीचे दिवस म्हणजे फॅशन जगतासाठी पर्वणीच असते. या काळात विविधरंगी, उठावदार, मनोहारी प्रकार, सिलेएट्स सौंदर्यात भर घालतात, आणि उत्सवी वातावरण द्विगुणित करतात. आपल्या देशातील सणासुदीसाठीच्या फॅशनबद्दल बोलायचं झालं तर तिच्यात शाही आणि श्रीमंती झोक अधिक जाणवतो. येत्या सणांच्या दिवसांत उपयोगी पडेल असे एथनिक फॅशनचे स्टाइल गाइड खास तुमच्यासाठी..  
सणांसाठी स्वत:च्या स्टॉकमधील कपडय़ांची खानेसुमारी करत असाल, आणि  कदाचित सलवार कुर्ता हा ड्रेसकोड तुम्हाला ओल्ड फॅशन्ड (काकूबाई टाइप्स) वाटत असेल तर त्याच ड्रेस प्रकारातील सुधारित प्रकारांची माहिती घेऊया, सलवार कमीजला बाद करण्याआधी प्लीज होल्ड आणि गिव्ह ए सेकण्ड थॉट.
पारंपरिक अनारकली (विथ हाय-लो हेम लाइन) ही ड्रेस स्टाइल, फॅशन जगतात आजही स्वत:चे स्थान टिकवून आहे तर मुलेट हेम लाइन प्रकारची बोर्डर याच अनारकली ड्रेससाठी फार आकर्षक दिसते आणि तजेलदार, आणि मॉडर्न (अद्ययावत) लूक देते. तेव्हा येत्या सणासुदीच्या दिवसांत या स्टाइलचा वापर नक्की करा.
दुरंगी सलवार कुर्ता (डय़ुअल टोन्ड) हा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड, या प्रकारात कुर्त्यांच्या बाह्य़ आणि अंग दोन विरोधी रंगात असते, आणि हीच गोष्ट ड्रेसला फंकी लुक देते. ड्रेसच्या विरोधी रंगसंगतीला छेद देण्यासाठी तुम्ही मंद रंगछटेची  शिफॉनची ओढणी घेऊ शकता आणि त्यांवर चंदेरी रंगातले लोंबते झुमके कानात घालू शकता.
संपूर्ण बॉलीवूडमध्ये अनेक प्रसिद्ध तारकांकडून वापरण्यात येणारी स्टाइल म्हणजे पार जमिनीला स्पर्श करेल इतक्या लांबीचा अनारकली प्रकार, मग ती अभिनेत्री ऐश्वर्या राय असो किंवा दीपिका पदुकोण असो, या ड्रेस स्टाइलमधली अनारकली कुर्त्यांची भुईला टेकणारी वाढीव लांबी तुमचा बांधा शिडशिडीत असल्यासारखा भासवते. अशाच एखाद्या सुंदर गळा( योक) असलेल्या अनारकली ड्रेसवर जमिनीपर्यंतच्या लांबीचे रॉ सिल्कचे गोटा वर्क केलेले जाकीट तुमच्या शरीराला उबदार तर ठेवेलच, पण तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नाटय़मय कलाटणी देण्याचे काम करील. यावर कडी म्हणजे काळ्या रंगाच्या लायनरने सजवलेले डोळे आणि थोडेफार कुंदन प्रकारातील दागिने अंगावर असतील तर तुम्ही सणासुदीनिमित्त होणाऱ्या पाटर्य़ामधून सगळ्याची मने सहज जिंकाल.   
लेहंगा हा पॅटर्न तसा जुनाच आहे, म्हणून सध्याच्या मौसमात लेहंगा सारी या सुधारित ड्रेस प्रकाराला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आशा बाळगून आहोत. या प्रकारात लेहंग्यांचा सुटसुटीतपणा साडीचे शालीन सौंदर्य यांचा सुंदर समन्वय असतो, त्यामुळे प्रत्यक्ष दिवाळीतील सणांच्या समारंभांना पारंपरिकतेची जोड असलेला लेहेंगा-सारी प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही.
आणि हे काहीच शक्य नसेल तर साडी ही सर्वाग सुंदर ड्रेसिंग स्टाइल आपल्यासाठी उपलब्ध असतेच, पण याचा अर्थ साडी प्रकार शेवटचा पर्याय आहे असे मुळीच नाही. उलट सणावारांना सहावारी साडी प्रकार चांगलाच भाव खाऊन जातो. पुन्हा दरवेळी साडी भरजरी कांजीवरम किंवा महागडी बनारसीच असली पाहिजे असे नाही, तर एखादी हलकीफुलकी साडी आधुनिक डिझाइन असलेली अर्बन साडी असेल तर फार उत्तम. अशी साडी ‘क्रॉप्ड टॉप’ किंवा ‘टँक टॉप’बरोबर आणि अंगासरशी बसणाऱ्या ‘ट्राउजर्स’ वर घातली जाते, यालाच आणखी आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही शिवाय ‘वेस्टकोट’चा ही वापर करू शकता.
– पियाली दासगुप्ता,  Myntra.com