07 July 2020

News Flash

‘व्हिवा लाउंज’मध्ये आज उलगडणार फिटनेस मंत्र..

अगदी वेगळ्या क्षेत्रात करिअर घडवताना, त्या स्वतच एक आदर्श बनल्या आहेत.

फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांच्याशी संवाद

स्वतचा फिटनेस ब्रॅण्ड निर्माण करणारी देशातली पहिली महिला पर्सनल फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांच्याकडून लाइफस्टाइल मॅनेजमेंटबाबत टिप्स घ्यायची संधी आजच्या व्हिवा लाउंजमधून मिळणार आहे.
माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, बिपाशा बसू, कतरिना कैफ, कंगना रानौट अशा अनेक सेलेब्रिटींना लीना मोगरे यांनी फिटनेसचे धडे दिले आहेत. लीना पर्सनल फिटनेस ट्रेनर तर आहेतच. पण त्यांनी फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून आहार आणि व्यायाम यांच्या परफेक्ट कॉम्बिनेशनबाबत त्यांच्याकडून सल्ला घ्यायला अनेक नामवंत येत असतात.लीना मोगरेज फिटनेस हा प्रसिद्ध ब्रॅण्ड त्यांनी सुरू केला असून मुंबई आणि मुंबईबाहेरही त्यांच्या जीम कार्यरत आहेत. सेलेब्रिटींसारखं शरीरसौष्ठव आपल्यालाही हवंहवंसं वाटतं, पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं, ते प्रत्येकाला जमू शकतं का, त्यासाठी किती वेळ आणि कोणता व्यायाम करायला हवा यासारख्या अनेक शंकांना थेट लीना यांच्याकडून आजच्या कार्यक्रमात उत्तरं मिळू शकतात. स्त्रियांच्या फिटनेस आणि व्यायामाबाबतच्या अनेक पूर्वग्रहांना छेद देत लीना मोगरे यांनी स्वत फिटनेसचा एक नवा धडा घालून दिला आहे. अगदी वेगळ्या क्षेत्रात करिअर घडवताना, त्या स्वतच एक आदर्श बनल्या आहेत. अशा जिद्दी, कणखर आणि फिट स्त्रीशी मनमोकळा संवाद आज साधता येणार आहे.

कधी : शुक्रवार,
२७ नोव्हेंबर
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क,
दादर (प.)
वेळ : सायंकाळी ५.४५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:24 am

Web Title: fitness talk with lina mogre
टॅग Viva Lounge
Next Stories
1 सजले रे क्षण माझे
2 ‘कांदेपोह्य़ां’चा बदलता ट्रेंड
3 आठवणींचा अल्बम
Just Now!
X