03 June 2020

News Flash

टीम इंडिया की जय हो

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं

| February 20, 2015 01:10 am

vv19सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
ती असते कायमच एक कांटे की टक्कर. त्यातही ती झाली वर्ल्ड कपमध्ये. आपण प्रत्येकानंच ती पाहिली नि अनुभवली. ‘क्रिकेट वर्ल्ड कप-१५’ हा शब्द गेले काही आठवडे ट्रेण्डमध्ये होता. पण या आठवडय़ात अव्वल ठरलं ते  indvspak‘’ हे ट्रेडिंग. त्यापाठोपाठ हटके ठरलं ते ‘जयहिंद’ हे ट्रेण्डिंग. ‘ट्विटर’च्या ट्रेण्ड्समध्ये पहिल्यांदाच ‘जयहिंद’ हा देवनागरी शब्द झळकला नि तो दुसऱ्या स्थानावर होता. शिवाय ‘मिसबाह’, ‘आफ्रिदी’, ‘शामी’, ‘अश्विन’, ‘रमीझ राजा’, ‘ब्लीड ब्ल्यू’ हे ट्रेण्ड्सही वरचढ होते. भारतानं टॉस जिंकल्यापासून ते विनिंग सेरेमनीनंतरही नेटकर मोठय़ा उत्साहानं ट्विट नि व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करत होते. विराटचं शतक नि सेल्फी, सोहेल नि शामीच्या विकेट्सच्या बोलबाल्यापासून ते विराट-अनुष्कावरचे जोक्स, पाकिस्तानच्या फॅन्सच्या फटाके ओएलएक्सवर घ्यायचे जोक्स, मॅचदरम्यान लागलेली ‘तोडो नहीं जोडो’ची प्रसंगोचित नि आवडलेली अ‍ॅड अशा कित्येक पोस्ट-ट्विट्सचा पाऊस पडत होता.
सामन्यादरम्यान ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांनी आपण कॉमेंट्रीचेही शहेनशहा असल्याचं दाखवलं. कॉमेंट्री करताना त्यांनी क्रिकेटसंबंधी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत ‘द वॉल’ राहुल द्रविड, ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर, अरुण लाल आणि कपिलदेव होते. ‘बिग बी’ कॉमेंट्री बॉक्समध्ये होते, तितका वेळ सिनेकलाकार ट्विट्स करत होते. त्यातही ‘काय मस्त सकाळ आहे. भारत-पाकिस्तान सामना आणि कॉमेंट्रीसाठी अमिताभ’ या शाहीद कपूरच्या ट्विटनं जणू सगळ्याच क्रिकेट नि अमिताभप्रेमींच्या भावना व्यक्त केल्या. सेलेब्रेटींपासून सामान्यांपर्यंत सगळ्या क्रिकेटप्रेमींनी ‘टीम इंडिया’चं अभिनंदन केलं. देशी फॅन्ससोबत टीम इंडियानं परदेशी फॅन्सनाही आपलंसं केलं. टेनिसस्टार रॉजर फेडररनं टीम इंडियाच्या जर्सीसोबत आपला फोटो ‘फेसबुक’वर पोस्ट करून, एकप्रकारे टीम इंडियाला चिअर अप केलं. आता पुढल्या २२ तारखेच्या दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचविषयी क्रिकेट फॅन्सना उत्सुकता वाटतेय. दक्षिण आफ्रिकेशी होणाऱ्या सामन्याच्या अ‍ॅडच्या व्हिडिओही वूअर्सना आवडतोय.
https://www.youtube.com/watch?v=Hu42D51aaGY
अरविंद, ओबामा नि ३६५ डेज
vn09सध्या सोशल मीडियावरच्या चर्चेतले पॉलिटिकल चेहरे आहेत अरविंद केजरीवाल नि बराक ओबामा. केजरीवालांच्या दिल्ली विजयानंतर त्यांच्या मॉर्निग वॉक सेल्फीपासून अनेक गोष्टींवर ट्विट्स नि पोस्ट अपडेट होताहेत. ‘यू-टय़ूब’वर ‘सो सॉरी’च्या ‘केजरीवाल सिंगिंग अँण्ड डान्सिंग टू ग्लोरी’ या व्हिडीओला एका दिवसात २७,८११ व्ह्य़ूज मिळाले होते.  www.youtube.com/watch?v=BwpWgtEDnB
बराक ओबामा यांचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, तो ‘यू-टय़ूब’ नि ‘फेसबुक ’वर शेअर केला जातोय. त्याबद्दल काही सांगण्यापेक्षा तो थेट पाहिलेलाच बरा. www.youtube.com/watch?v=MFF-Ajgfd4o
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ‘३६५ डेज’ या चित्रपटाच्या नंदू आणि अनैकाच्या भूमिका असणाऱ्या या टीझरला यू-टय़ूबवर एका दिवसात १,१९,७२४ व्ह्य़ूज मिळाले होते. https://www.youtube.com/watch?v=NFevC4qOKJg
‘एआयबी’वर चर्चा सुरूच
‘एआयबी’वरील चर्चेचं गुऱ्हाळ थांबायचं नाव घेत नाहीये. आता आमिर खाननं ‘एआयबी रोस्ट’ या कार्यक्रमाच्या विरोधात आवाज उठवलाय. हा शो अश्लील आणि आक्षेपार्ह आहे, असं परखड मत त्यानं एका कार्यक्रमात व्यक्त केलं. त्याच्या मते, ‘एआयबी हा शो सभ्य समाजाला लज्जित करेल असा आहे. त्यामुळं लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होईल. हा कार्यक्रम मी पूर्ण पाहिला नाही, कारण झलक बघूनच मी उद्विग्न झालो. करण जोहर आणि अर्जुन कपूर माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी असा शो करणं मला अजिबात आवडलं नाही. प्रत्येक व्यक्तीला आविष्कारस्वातंत्र्य आहे, हे मला मान्य आहे; मात्र कलाकार म्हणून आपण सामाजिक भान राखायला पाहिजे.’ आमिर खानच्या या व्हिडीओला २३ तासांत २,९५,२४४ व्ह्य़ूज मिळाले होते. तर स्टॅण्डअप कॉमेडियन रसेल पीटरनं ‘आमिर खाननं या विषयात लुडबुड करू नये,’ असा सल्ला दिलाय. ‘आमिर खान कोण आहे? त्यानं स्वत:च्या कामात लक्ष घालावं, या विषयात लुडबुड करू नये. कोणी तरी जाऊन त्याला सांगा की गप्प बस’, असं उत्तर रसेलनं दिलंय. ‘एआयबीला हिंसक शो म्हणणारा आमीर कोण आहे?’ शो न बघता त्यावर टीका करण्यात काहीच अर्थ नसल्याचं रसेल म्हणतोय.
फेसबुकवर रहा अमर
फेसबुकनं आता मृत्यूपश्चातही आभासी जगात जिवंत राहण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. अर्थात, फेसबुकवर खातं असणारी एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतरही आठवणींच्या स्वरूपात तिचं खातं चालू ठेवता येणार आहे. यासाठी फेसबुकनं लिगसी काँट्रॅक्टची सोय केलीय. यामुळं मृत व्यक्तीच्या खात्याची स्थिती memorialized अशी होईल. त्यामुळं त्या व्यक्तीच्या टाइमलाइनवर स्मृतींना उजाळा देता येईल. जिवंतपणी न जोडलेल्या मित्रांची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारण्याची सोय, प्रोफाइल पिक्चर नि कव्हर फोटोही बदलता येऊ  शकेल. त्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाइकांना त्याच्या फेसबुक खात्यात प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येणारेय. त्यासाठी फेसबुकच्या  www.facebook.com/help/contact/651319028315841   या लिंकवर क्लिक करा.
निषेध अन् श्रद्धांजली
नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्लेखोर अद्याप मोकाट असताना महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे पितामह, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, विचारवंत आणि कोल्हापूरकरांचे ‘अण्णा’ कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पी उमा पानसरे यांच्यावर घराजवळच प्राणघातक हल्ला झालाय. या हल्लय़ाचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जातोय. तर माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या  निधनामुळं हळहळ व्यक्त होत असून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.  
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2015 1:10 am

Web Title: latest social media news
Next Stories
1 पंधरवडय़ात ४ किलो वजन घटवायचंय?
2 ‘हटके’ स्टायलिंग
3 फॅशनमधून जनजागृती
Just Now!
X