18 November 2019

News Flash

आज ठाण्यात गप्पांची ‘मुक्त’मैफल

चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूमिकांमुळे स्वतचं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी प्रगल्भ अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘लोकसत्ता’च्या वाचकांशी गप्पा मारायला...

| March 7, 2014 01:15 am

चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूमिकांमुळे स्वतचं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी प्रगल्भ अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘लोकसत्ता’च्या वाचकांशी गप्पा मारायला आज ‘व्हिवा लाउंज’मध्ये येणार आहे. भूमिकेचा अभ्यास करून पूर्ण तयारीनं काम करणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणून मुक्ताचं नाव घेतलं जातं. मुक्ताने रंगवलेली ‘जोगवा’मधली सुली ते ‘मुंबई- पुणे – मुंबई’मधली टिपीकल मुंबईची मुलगी तितकीच थेट भिडली. ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’ सारख्या नाटकांमधल्या भूमिकांमधून तिच्यातली चतुरस्र अभिनेत्री दिसली. ‘अग्निहोत्र’मधली तिची मंजुळा आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली राधा अजून प्रेक्षकांच्या मनात आहेत. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीशी संवाद साधायची संधी आज मिळणार आहे. व्हिवा लाउंज त्यानिमित्ताने प्रथमच ठाण्यात होणार आहे. ‘टिपटॉप प्लाझा’ या कार्यक्रमाचा व्हेन्यू प्रायोजक आहे तर ‘झी २४ तास’ टेलिव्हिजन पार्टनर आहे. उद्या (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता ‘झी २४ तास’वर मुक्ताबरोबरची ही गप्पांची मैफल प्रक्षेपित करण्यात येईल.
कधी : आज शुक्रवार, ७ मार्च / कुठे : टिप-टॉप प्लाझा, एलबीएस मार्ग, ठाणे (प). / वेळ : दुपारी ३.४५ वा.
प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश

First Published on March 7, 2014 1:15 am

Web Title: mukta barve in viva lounge 3