News Flash

धावती फॅशन

नुसतंच धावणं नव्हे तर धावताना स्टायलिश दिसणं हेही गरजेचं असतं..

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

आपल्या आहार आणि तब्येतीविषयी सजग राहणारी तरुण पिढी आता मॅरेथॉनमध्ये जोमाने धावताना दिसते आहे. कमीत कमी वेळेत लांब पल्ल्याचे अंतर पार करणारे धावपटू सध्या वेगाबरोबरच आपल्या फॅशनवरही मेहनत घेताना दिसतात. नुसतंच धावणं नव्हे तर धावताना स्टायलिश दिसणं हेही गरजेचं असतं..

काळानुसार लोकांची बदलती जीनवशैली, बैठं काम, बाहेर खाण्याचं प्रमाण अशा अनेक कारणांमुळे  लहान वयात पाठदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, गुडघेदुखी असे आजार बळावू लागले आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आजारी पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन तरुण पिढी आता फिट राहण्याबद्दल सजग झाली आहे. योगासने, झुम्बा, पोहोणे, जिमला जाणे आणि धावणे यासारखे व्यायाम मोठय़ा प्रमाणावर के ले जातात. यापैकी धावण्याचा व्यायाम हा माणसाच्या शारिरिक क्षमतेचा कस लावणारा ठरतो. धावण्याने वजन कमी होते. त्याचप्रमाणे हाडे आणि स्नायू यांनाही बळकटी मिळते. यामुळे आयटी, सेवा क्षेत्रांतील अनेक तरुण-तरुणी सध्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना दिसतात. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीला मॅरेथॉन असे म्हणतात. देशातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये हौशे, नवशे गवशे धावपटूही सहभागी होतात. काही फक्त धावण्यासाठी येतात तर काही धावण्याची मजा अनुभवण्यासाठी.. मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचे निश्चित वेळात ठरलेले अंतर पार करण्याचे लक्ष्य असते. हे लक्ष्य पार करतानाच आता स्पर्धक धावण्याबरोबरच दिसण्यालाही प्राधान्य देत आहेत.

नीटनेटके कपडे, रंगसंगतीशी मिळतेजुळते साहित्य असा थाट मॅरेथॉनच्या वेळी पहायला मिळतो. या निमित्ताने आता तरुणांमध्ये जिमच्या फॅशनसोबतच खास मॅरेथॉन फॅशनची संकल्पना रुजू लागली आहे. मुंबईत वर्षांच्या सुरवातीलाच टाटा मुंबई मॅरेथॉनने शुभारंभ होतो. नंतर वसई, सातारा हिल, ठाणे वर्षां मॅरेथॉन, पुणे आणि नाशिक असे वर्षभर विविध शहरातील मॅरेथॉनचे गच्च वेळापत्रक ठरलेले असते. धावण्यासाठी साधारणत: टी शर्ट, पॅन्टशी साधर्म्य सांगणारे शूज, घडय़ाळ, नॅपकिन, पाण्याची बाटली असा पोशाख असतो. परंतु आता यात चांगल्या प्रतीचे, ब्रॅण्डेड आणि वेगळ्या रंगसंगतीचे कपडे वापरण्यावर भर दिला जातो आहे. हे साहित्य घेण्यासाठी आदिदास, डिकॅथलॉन, नायके आणि शहरातील क्रीडा साहित्य मिळणारी दुकानं पालथी घातली जातात.

अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या बाबू यादवला धावण्याबरोबरच कपडे आणि साहित्यही महत्वाचे वाटते. ‘धावताना मी सुटसुटीत पोशाख आणि शूजला जास्त प्राधान्य देतो. ‘स्केचर्स’, ‘नायके’, ‘आदिदास’, ‘पुमा’ आणि ‘स्पार्क्‍स’ या कंपन्यांचे शूज धावपटूंमध्ये लोकप्रिय आहेत. याची किंमत १ हजार रुपयांपासून सुरु होते. टी शर्ट आणि पॅन्टच्या रंगसंगतीनुसार शूज निवडले जातात. काळा, नियॉन, लाल, निळया रंगाचे शूज सर्वात जास्त घेतले जातात. लायक्रा, नायलॉनचे टी शर्ट अथवा स्वेटशर्ट, शर्टाशी मिळत्याजुळत्या पॅन्ट्स असा पेहराव मी करतो. मॅरेथॉनमध्ये आयोजकांकडून स्पर्धकांना टी शर्ट दिले जातात. काळ्या रंगाची शॉर्टस वापरण्यास मी प्राधान्य देतो’. १०, २१ आणि ४२ किलोमीटर अशा लांब पल्लयांचे अंतर धावताना घाम जास्त येत असल्याने स्पर्धक नॅपकिन जवळ बाळगतात, अशी माहिती त्याने दिली. या नॅपकिनमध्येही रंगसंगतीला महत्व प्राप्त झाले आहे. मॅरेथॉनमध्ये अचूक वेळेची माहिती देणारी घडय़ाळंही मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे सामान्य घडय़ाळांपेक्षा ही घडय़ाळे वेगळी असल्याने त्याला जास्त पसंती मिळते मात्र याची किंमतही जास्त असते. खास धावण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या घडय़ाळांमध्ये जीपीएसच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके, धावण्याची गती, कॅलरीचे प्रमाण मोजण्यात येते, असे सांगतानाच आपल्याकडे विवोस्पोर्टसचे घडय़ाळ असल्याची माहिती त्याने दिली. मी आता जरा चांगले राहण्याकडेही लक्ष देतो आहे, असे म्हणणाऱ्या बाबूने १९ जानेवारीला होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून ४१किलोमीटरचे अंतर ३ तासात पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.

मॅरेथॉन सुरू होण्याआधी शेवटच्या काही दिवसांत नवीन कपडे, शूज खरेदी न करण्याचा सल्ला धावपटू रेश्मा शेट्टी यांनी दिला. रेश्मा गेल्या अनेक वर्षांपासून विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. ‘मी मॅरेथॉनमध्ये धावताना लगेच नवीन साहित्य आणि कपडे वापरत नाही. कारण लगेच नवीन कपडे घातल्यास शरीराला खाज, जळजळ, अस्वस्थता होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी कपडे आणि शूज घालून एक ते दोन महिना सराव करते. त्याची शरीराला सवय झाल्याने त्रास होत नाही. धावताना मी चांगल्या प्रतीचे कपडे खरेदी करण्यास प्राधान्य देते. लांब पल्लयांचे अंतर कापताना सूर्यप्रकाशापासून रक्षण करण्यासाठी काळ्या रंगाचे स्कीन फिट्सही घालते, असे त्यांनी सांगितले.

महिला धावताना जास्त स्परेटस ब्रा कडे लक्ष देतात. अंतवस्त्रात व्यवस्थित असल्यास पळण्यास अडचण होत नाही. लाल, काळा, नियॉन रंगाच्या स्पोर्टस ब्रावर लाईट रंगाचा शर्ट घातल्यास जास्त उठून दिसतो. काळ्या रंगाची शॉर्टस कोणत्याही रंगावर उठून दिसत असल्याने ती जास्त घातली जाते. काळ्या शूजवर लाल, निळा, पिवळा, पांढरा मोज्यांची रंगसंगती केली जाते. तसेच केस बांधण्यासाठी बँड, रबर, क्लिप्स, स्वेट बँड्स याचा उपयोग करतात.

धावण्याची ही वाढती फॅशन लक्षात घेऊन यंदा टाटा मुंबई मॅरेथॉनतर्फे बाजारात विशेष शूज, टी शर्ट आणि जॅकेट उपलब्ध केले आहेत. निळ्या आणि गुलाबी रंगात ‘मुंबई’ अशी अक्षरे लिहीलेल्या शूजची किंमत २९९९ हजार रुपये आहे. याचबरोबर पुरुष आणि महिलांसाठी , स्वेटर्शटस, टी र्शटस आणि जॅकेटही तयार करण्यात आले आहेत. ‘डिकॅथलॉन’ हे क्रीडासाहित्य घेण्यासाठी धावपटूंचे लोकप्रिय स्थळ आहे. येथे खांद्याला मोबाईल बांधण्यासाठी पट्टे, छोटे साहित्य ठेवण्यासाठी पाऊच आणि जेल जास्त विकले जातात असल्याचे डिकॅथलॉन येथे काम करणाऱ्या वैभव काटरे यांने सांगितले.

नऊवारीत धावण्याचा विक्रम

मॅरेथॉनमध्ये एका विशिष्ट कारणासाठी तसेच समाजिक समस्येविषयी जागरुकता करण्यासाठी अनेक पुरुष आणि महिला स्पर्धक विविध पोशाख परिधान करतात. ‘भ्रष्टाचार’, ‘पर्यावरणाचा संदेश’, ‘वृक्षलागवड’, ‘धूम्रपाननिषेध’ असे विषय घेत विविध धावपटू  मिलिंद सोमणच्या पिंकेथॉनमध्ये महिला नऊवारी साडीत धावल्या होत्या. मार्च महिन्यात सांगली येथील पिंकेथॉन मध्ये डॉ. मनाल अन्तीकाठ या पेसरनी नऊवारी साडीत २१ किलोमीटर अंतर पार केले होते. पांरपारिक वेशभूषा आणि तसेच फॅशनमधील प्रयोग यामुळे मॅरेथॉन वेगळेपण राखत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2020 4:14 am

Web Title: needs to look stylish while running abn 97
Next Stories
1 संशोधनमात्रे : ध्येयनिश्चितीची वाट!
2 बुकटेल : काळाचा वेध घेणारा ‘दंशकाल’
3 माध्यमी : नऊ क्षण टेन्शनचे
Just Now!
X