आपल्याकडे लेटेस्ट फॅशनचे आणि ट्रेंडी कपडे, अॅक्सेसरीज असलेच पाहिजेत असं सगळ्यांनाच वाटतं. पण कुठली फॅशन इन आहे, कुठे चांगला चॉईस मिळेल आणि बेस्ट डील काय असू शकेल हे कळत नाही. व्हिवाच्या फॅशन रिपोर्टर त्यांना आवडलेल्या गोष्टी या सदरातून तुमच्याशी शेअर करतील. फक्त एक अंदाज मिळावा म्हणून त्या गोष्टी कुठे मिळाल्या आणि केवढय़ाला मिळाल्या तेही सांगतील.  शॉपिंगसाठी व्हिवा पीक ऑफ द विक किती उपयुक्त ठरतंय, आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आयडी – viva.loksatta@gmail.com

कोल्हापुरी नेकलेस
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या हुपरी गावची चांदी प्रसिद्ध आहे. तिथे या पद्धतीची गळसर गावातल्या स्त्रिया पारंपरिक दागिना म्हणून घालतात. ही ज्वेलरी तांबं आणि व्हाइट मेटल मिक्स करून बनवली जाते. मग त्यावर सिल्व्हर कोटिंग करून ऑक्सिडेशन केलं जातं. म्हणून याला ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी असंही म्हणतात. मुंबई-पुण्यात ही विकत घ्यायची असेल तर तुम्हाला एक्झिबिशनच धुंडाळावी लागतात. आम्हाला हा ठाण्यातील एका प्रदर्शनात मिळाला. कुठल्याही पारंपरिक, एथनिक किंवा वेस्टर्न वेअरवरसुद्धा हा नेकलेस मस्त दिसेल.
यूएसपी : ऑक्सिडाइज्ड अँटिक लूक
ठिकाण : कोल्हापूर, भवानी मंडप.
मुंबई- पुणे प्रदर्शनांमधून
किं मत : ४०० रुपये.

कलर्ड बेल्ट
कपडय़ाला मॅचिंग बेल्ट वापरून तुम्ही तुमचा लूक आणखी उठावदार करू शकता. हे बेल्ट तसे टय़ुनिक्स, ट्राउझर्स किंवा जीन्स अथवा स्कर्टवर वापरू शकता. ड्रेसची शोभा याने वाढेल तसा सुटसुटीतपणाही येईल.
किमतीनुसार बेल्टच्या डिझाइनमध्ये आणि बक्कलमध्ये फरक येतो. ६० ते ८० रुपयांच्या डेनिम बेल्टचं साधं बक्कल येतं. त्याला दुकानदार इंडियन बक्कल म्हणतो तर १२० रुपयांच्या बेल्टचं बक्कल ‘इम्पोर्टेड’ असल्याचं सांगितलं जातं. बक्कल कसंही असलं तरी रंगीबेरंगी बेल्ट स्वस्तात मस्त अशी अॅक्सेसरी आहे यात शंका नाही.
यूएसपी : कॅची कलर्स  ठिकाण : गोखले रोड, ठाणे किमत : १०० रु.

पिंक बॅलेरिना शूज
या पिंक विथ वाईट नॉट शूजची किंमत दुकानदार जरी ४५० रुपये सांगत असला तरी बारगेन केलं तर किंमत आणखी खाली येऊ शकते. तुमच्या बार्गेनिंग स्कीलवर ते अवलंबून आहे. फ्लॅट सॅण्डलची फॅशन सध्या आहेच. त्यात हे पिंक विथ व्हाइट नॉटवाले बॅलेरिना रंगामुळे खुलून दिसतात.
यूएसपी : कॅची कलर
ठिकाण : बांद्रा, लिंकिंग रोड.
किंमत : ४५० रुपये.

कॅची कलर नेलपेंट
हल्ली नेलआर्टची क्रेझ सगळ्यांमध्येच दिसते. त्यातही नियॉन कलर्सची चलती आहे. ही नेलपेंट तुम्ही जाता-येता ट्रेनमधून सहजपणे विकत घेऊ शकता. बरेच कॅची कलर्स यात उपलब्ध आहेत. पिवळा, पोपटी, नारंगी, निळा, आकाशी आणि बरेच काही. प्रत्येक बोटाच्या नखाला वेगळा रंग लावण्याची नवीन स्टाइल आजकाल आलीय. त्यासाठी हे स्वस्तात मस्त नियॉन कलर्स डीलमध्ये मिळू शकतात.
यूएसपी : नियॉन कलर्स;  ठिकाण : लोकल ट्रेन
किंमत : २० रुपये.
संकलन – नेहा टिपणीस