|| प्रियांका वाघुले

काही गोष्टी आपण आयुष्यात नित्यनियमाने करत असतो. जेवण, झोप, काम या गोष्टी नित्यनियमाने होत असताना असाच नियमितपणा आपल्या व्यायामातही असलाच पाहिजे, असे सौरभ गोखले म्हणतो. कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहिलो तरच तिचा उपयोग आपल्याला होतो.

pravin tarde shares special post for devendra gaikwad after he won filmfare award marathi 2024
“चौकातल्या पोराला फिल्मफेअर”, प्रवीण तरडेंची खास पोस्ट पाहून देवेंद्र गायकवाड भावुक, म्हणाले, “पदोपदी…”
Gautami Deshpande upset after watching Mrunmayee Deshpande video
Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…
marathi veteran actor vijay chawan and vibhavari chawan love story
ओळख, प्रपोज अन् मग होकार…; विजय चव्हाण व विभावरी जोशी यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी
Pooja hegde and rumoured boyfriend rohan mehra spotted together video viral
पूजा हेगडे रोहन मेहराला करतेय डेट? अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याचा मागोवा घ्यायला हवा, असे सौरभ म्हणतो. मनाचा आणि शरीराचा फिटनेस राखण्यासाठी आपण मोकळ्या हवेत जायला हवं, असे तो म्हणतो. शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी ही गोष्ट जरा अवघड असली तरी त्यासाठी पर्याय शोधणे आपले आपल्याला जमायला हवे, असे तो म्हणतो. त्यासाठी जिममध्ये कार्डिओ करण्याऐवजी सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत चालण्याला, धावण्याला तो प्राधान्य देत असल्याचे सांगतो. त्याचबरोबर जिममध्ये वेट ट्रेनिंग नियमितपणे करताना त्यात सातत्य न ठेवता दर दोन ते तीन आठवडय़ाने व्यायामक्रम बदलत असल्याचेही त्याने सांगितले. हिप थ्रस्ट, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, स्प्लिट स्क्वॉटसारख्या व्यायाम प्रकारांचा त्याच्या दैनंदिन व्यायामात समावेश केला आहे.

कोणताही पदार्थ सारखा खाल्ला की त्याच्या चवीची जिभेला सवय लागते. अगदी तसंच आपला व्यायामाच्या फॉरमॅटची शरीराला काही काळाने सवय होते. त्यामुळे शरीराला अशी सवय होऊ  देण्यासाठी आणि शरीराने नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे. त्यासाठी व्यायामक्रम, व्यायाम प्रकार बदलले जात असल्याचे सौरभ सांगतो.

फिटनेस शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने आपल्या व्यायामात खंड पडू नये म्हणून सौरभ सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगतो. काहीही कारणास्तव बाहेरगावी असतानादेखील सौरभ त्या ठिकाणी जिमला त्या त्या दिवसापुरते जात असल्याचे सांगतो. मुळात घरात फिटनेस या गोष्टीला अतिशय महत्त्व असल्याने आपोआपच आपल्याला ही शिस्त लागल्याचे त्याने सांगितले. आजोबा, वडील, भाऊ  अशी पिढय़ांपासून चालत आलेली ही व्यायामाची शिस्त सौरभनेही अंगी बाणवून घेतली आहे. या शिस्तीचे फायदेच जास्त असल्याचे तो त्याच्या अनुभवांवरून सांगतो.

viva@expressindia.com