28 February 2021

News Flash

अस्ता‘व्यस्त’!

‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेनुसार करोनाचा सर्वात अधिक आणि गंभीर परिणाम जागतिक तरुण पिढीवर झालेला आहे.

|| गायत्री हसबनीस

‘वर्क फ्रॉम होम’ कल्चरमध्ये तरुणाई आता चांगलीच रुळली असली तरी कामाचं बदललेलं स्वरूप, अनिश्चिात वेळा, थांबलेला मानसिक संवाद, कपड्यांपासून हरतºहेच्या शॉपिंगला लागलेली काट, डाएटची वाट असं सगळंच आयुष्य सध्या अस्ताव्यस्त झालं आहे…

सकाळचा फक्कड चहा मिळाल्यानंतर भराभर आवराआवर करून, न्याहारी आटपून  टिपटॉप तयारीत लगबगीने ऑफिसला निघणारी मंडळी गेल्या वर्षीपासून ‘वर्क फ्रॉम होम’चा अनुभव घेते आहे. करोनामुळे घरीच बसून झूमवर मीटिंग्ज अटेन्ड होत राहिल्या, सहकाऱ्यांबरोबरचा संवाद हरवला, घरून काम सुरू असल्याने ऑफिसचा फील तर गेलाच पण इतर अनेक गोष्टींवरही नकळत मर्यादा आल्या. त्या सर्व गोष्टी आजच्या तरुण पिढीच्या जीवनशैलीशी घट्ट निगडित आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा भार अर्थातच अधिक वाढला, कारण बरेच कर्मचारी कंपनी सोडून गेले. बऱ्याच सहकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे कामाचा व्याप सांभाळत आपली नोकरी टिकवणं हे नवं आव्हान तरुणाईसमोर उभं राहिलं आहे.

‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेनुसार करोनाचा सर्वात अधिक आणि गंभीर परिणाम जागतिक तरुण पिढीवर झालेला आहे. ते म्हणतात, करोनामुळे जागतिक मंदीमध्ये बऱ्याच तरुणांची सर्वच स्तरावरील वाढ थांबली आहे आणि जर आताच यावर काही मार्ग शोधला नाही तर जगाचे भविष्य असणाऱ्या तरुण पिढीला स्वत:ला सावरणं कठीण होऊन जाईल. सध्या तरुणाईची जीवनशैली बदलली किंवा त्यात अडथळा आला तर कुठलाच समतोल राहणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तरुणाईची प्रॉडक्टिव्हिटी कमी होत जाते आहे, योग्य आहार, राहणीमान, फिटनेस नसल्याने त्यांच्या जीनवशैलीवर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तरुण पिढीची जीवनशैली आधीच बदलली आहे आणि काळानुसार ती बदलतच राहणार किंबहुना बदलत राहिली पाहिजे, परंतु जीवनशैलीशी निगडित असलेल्या चांगल्या किं वा वाईट सवयी अचानक मोडता कामा नयेत आणि करोनोमुळे नेमकं हेच झालं आहे, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

कॉपोर्रेट कंपनीमध्ये काम करणारा परिक्षित शर्मा सांगतो, मानसिक – शारिरीक स्वास्थ्यावर ‘वर्क फ्रॉम होम’मुळे खूप घातक परिणाम झाला आहे, कारण फक्त एका खोलीत बसून क्रियाशील राहणं अत्यंत कठीण आहे. त्यातून ऑफिस कल्चर हे आपल्याला ती क्रियाशीलता देतं जे तुमच्या शारिरीक अथवा मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांशी असणारा सततचा संपर्क, कामाची चर्चा आणि देवाणघेवाण. शारीरिकरीत्या तुमची हालचाल फार महत्त्वाची असते जी घरात बसून काम करताना होत नाही, पण ऑफिसमध्ये होते. फिटनेस क्रियाशील राहण्यानेच मिळतो, पण मुळात त्यासाठी ऑफिसची गरज आहे. ऑफिस ती क्रियाशीलता देते आणि क्रियाशीलता फिटनेस राखण्यात मदत करते. वर्क फ्रॉम होममुळे क्रियाशीलतेवरच बंधनं आली आहेत, असं तो म्हणतो. परिक्षितच्या मते तरुण पिढी ही जास्त स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंगवर भर देते. त्यामुळे त्यानुसार सर्वांचा फिटनेस, शॉपिंग फंडा जज केला जातो. ट्रॅव्हल करणारे लोक जास्त फिट असतात, असं माझं निरीक्षण आहे. ज्या लोकांच्या ट्रॅव्हलिंगवर वर्क फ्रॉम होममुळे बंधनं आली असतील त्याच्या फिटनेसवर नक्कीच परिणाम झाला आहे यात शंका नाही, असं परिक्षित सांगतो. मात्र प्रत्येकाची फिटनेसची व्याख्या वेगळी आहे. कामांच्या अनियमित वेळांमुळे काहींच्या झोपेवर परिणाम झाला आहे. तर काहींना वर्क फ्रॉम होमचे काही फायदेही जाणवतात. मुंबईचा मोहित खोसला म्हणतो, वर्क फ्रॉम होममुळे ऑफिसपर्यंत ट्रॅव्हल करण्याचा खर्च वाचतो, भर उन्हात फिरावं लागतं नाही किंवा फार दगदग होत नाही. परंतु माझे व्यक्तिमत्त्व घरात बसून राहण्याचे नाही. मी कोणत्याही सुट्टीच्या दिवशी घरी नसतो पण वर्क फ्रॉम होममुळे मात्र माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध बळजबरीने घरात बसून काम करावं लागतं आहे. घरात बसून काम करण्याची सवय लावताना मला माझ्या स्वभावाला मुरड घालावी लागली. माझ्या स्वभावाविरुद्ध मला घरात बसणं आवश्यक झालं. माझं व्यक्तिमत्त्व एकलकोंडं नाही आणि सतत लोकांच्या सहवासात स्वत:ला सामावून घेण्याची माझी वृत्ती असल्याने ऑनलाइन सहवासावरच समाधान मानावं लागलं. मात्र यातला कृत्रिमपणा फार त्रासदायक असल्याने मानसिक स्वास्थ्य गडबडले. सतत मना विरुद्ध गोष्टी होत आहेत हे समजताच मूड स्विंग्सचा मारा सतत होत राहिला, असे तो सांगतो.

तरुण पिढीची एक महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे शॉपिंगची. मोहित सांगतो, लॉकडाऊनमुळे शॉपिंग करताना बरेच अडथळे आले. आधी मी ऑनलाइन शॉपिंगच्या डील्स पाहायचो आणि प्रत्यक्षात ऑफिस संपल्यानंतर पटकन ऑफिसजवळच्या शॉपमधून घेऊन यायचो. म्हणजे थोडक्यात मला शॉपिंग करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होते. पण लॉकडाऊननंतर मात्र अजूनही काही ओपन न झाल्याने मला शहरात प्रवास करून शॉपिंगसाठी यावं लागतं. मध्यंतरी तर अशी परिस्थिती होती की शॉपिंग करण्यासाठी काही कारणच नव्हतं ना ओकेजन होतं. त्यामुळे शॉपिंग पूर्णपणे बंदच झालं होतं. तर तन्वी भट्टच्या मते, या वर्किं ग पॅटर्नशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला, परंतु वर्क फ्रॉम होमचा काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. ऑफिससारखं योग्यपणे बसण्याची पद्धत घरी नसल्याने पाठदुखी, पायदुखीसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्याचबरोबर कामाचा व्याप थोडा वाढला असल्याने पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील बॅलन्स बिघडला आहे. सुट्ट्या कशा निघून जातात हे कळत नाही. कारण घराबाहेर जाणे बंदच झाले आहे. त्यामुळे मेंटल स्ट्रेसलाही सामोरे जावे लागते आहे. मात्र प्रत्येक गोष्टीचा फायदातोटा दोन्ही असतो, तसेच वर्क फ्रॉम होमचा काही प्रमाणात फायदादेखील झाला आहे. वर्क फ्रॉम होमने हेल्थ चांगली ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. मी या गोष्टीवर कधीच इतका विचार केला नव्हता, परंतु आता करायला लागले आहे. होम फु ड, रोजच्या रोज थोडा वॉक घेणं हे ध्येय ठेवलं आहे जेणेकरून हेल्थच्या तक्रारी राहणार नाहीत, असं ती म्हणते. आत्तापर्यंत ऑनलाइन शॉपिंगची सवय नसलेली तन्वी सध्या त्यावरच भर देते आहे. एकू णच बदलाचा हा अनुभव चांगला आहे, असे सांगतानाच वेळेनुसार सतत स्वत:त बदल करणं महत्त्वाचं वाटत असल्याचं तन्वी सांगते.

एकं दरीत वर्क फ्रॉम होम कल्चरचे काही फायदे तर काही तोटे अनुभवणाऱ्या तरूणाईचे आयुष्य सध्या अस्ताव्यस्त झाले आहे. मात्र त्यातून आपापला सूर शोधत पर्सनल आणि प्रोफे शनल गरजा-आवडींचा समतोल साधण्याचा प्रयत्न तरुणाई मनापासून करताना दिसते आहे. प्रॉडक्टिव्ह राहणं ही तरुणाईची गरज आहे, मात्र कामाच्या धबडग्यातून आणि बंधनातून यावरही मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना निश्चितच नवी वाट मिळवून देईल.

 

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:35 am

Web Title: work from home culture shopping corona virus zoom akp 94
Next Stories
1 करिअर ‘ब्रेक’
2 वस्त्रांवेषी : व स्त्र प्र था
3 बीइंग पेट पेरेंट
Just Now!
X