vn05 
vv08काळा रंग सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवरचा आवडता. सकाळच्या कॅज्युअल फंक्शनच्या वेळीदेखील ब्लॅक कलर किती सुंदररीत्या मिरवू शकतो याचं उत्तम उदाहरण आजच्या आपल्या दोन्ही सेलिब्रिटींनी दिलं आहे.

सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. या सगळ्यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..

vn07जॅकलिन फर्नाडिस
हिच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ही ‘मिस श्रीलंका’ ठरलेली. त्यात सोनम कपूरसारखी फॅशन कॉन्शियस मैत्रिण असल्यावर स्टाइल चुकण्याची काय बिशाद! इथेही ब्लॅक आणि व्हाईट स्ट्राईपच्या या ब्लॅक ड्रेसमध्ये ती लक्ष वेधून घेत आहे. व्हाईट वॉच आणि इअररिंग्ससोबत ब्लॅक सिलेटोज या मोजक्या अ‍ॅक्ससरीजने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vn08टिस्का चोप्रा
हिचं नाव स्टाईलिश सेलेब्रिटीजच्या यादीत फार कमी वेळा घेतलं जातं, पण तिची ड्रेसिंग स्टाइल एलिगंट आहे आणि म्हणून नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. आता इथेच बघा ना, फिटेड टक इन टी-शर्ट विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर आणि सोबत क्लच, यामध्ये पॉईंट आऊट करण्यासारखे असं काहीच नाही.
छायाचित्रे : प्रकाश येरम